वाशीम,
dharnas-and-morchas-of-cmc महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या करिता बुधवार, ३० जुलै रोजी वाशीम येथे भव्य मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाद्वारे संचालित महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अहोरात्र परिश्रम घेण्याचे कार्य लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचारी करीत आहेत.
परंतु, या कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारचे मानधनसाठी अनुदान दिले जात नाही, हे सर्व कर्मचारी स्वबळावर उत्पन्न आणून केंद्र चालवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या माविम महामंडळ मार्फत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणासंबंधीचे ग्रामीण व शहरी स्तरावरील कार्यक्रम उपक्रम यशस्वी करण्याचे अहोरात्र काम केंद्रातील व्यवस्थापक लेखापाल सहयोगीनी सीआरपी करीत आहेत. परंतु, या कर्मचार्यासाठी माविम महामंडळ महिला बालविकास विभागाकडून कोणतेही प्रकारचे मानधन दिले जात नाही, त्यामुळे सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ घेऊन उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.dharnas-and-morchas-of-cmc हे आंदोलन माविमच्या सर्व सीएमआरसी ने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३० जुलै रोजी या कर्मचार्यांच्या वतीने मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. वाशीम जिल्ह्यातील १२ सीएमआरसी केंद्रातील कर्मचार्यांच्या वतीने वाशीम शहर पोलिस स्टेशन येथुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर मोर्चा भारतीय मजदूर संघांतर्गत माविम कम्युनिटी मॅनेजर सेंटर कर्मचारी संघ महाराष्ट्राच्या वतीने काढण्यात येणार आहे. तरी वाशीम जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगीनी, सीआरपी यांनी मोर्चे व धरणे आंदोलन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन वाशीम जिल्हा माविम सीएमआरसी कंत्राटी कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.