हेपाटायटीस बी व सी गंभीर आजार

29 Jul 2025 12:40:53
नागपूर, 
hepatitis-b जगभरात 30 कोटींपेक्षा अधिक लोक क्रोनिक हेपाटायटीसने ग्रस्त असून बहुतेकांना त्यांच्या स्थितीबद्दल माहितीच नसते. विशेषतः हेपाटायटीस बी व सी हे लिव्हर सिरोसिस व यकृत कर्करोगाचे प्रमुख कारण आहेत. त्यामुळे दरवर्षी सुमारे 13 लाख मृत्यू होतात. लस व उपचार उपलब्ध असूनही, अजूनही असंख्य लोक अनभिज्ञता, सामाजिक कलंक व मर्यादित आरोग्यसेवेमुळे त्रस्त आहेत.
 


hipat 
 
 
लोक अनभिज्ञ असल्यानेे तसेच माहिती असले तरी दुर्लक्ष करणारे, गांभीर्याने घेत नसलेल्यांमध्ये अवगत करून देण्याची गरज अधोरेखित होत आहे. म्हणूनच जगभरात 28 जुलैला हेपेटाइटिस दिवस पाळला जातो. हेपाटायटीस बी विषाणूचा शोध लावून लस विकसित करणारे नोबेल पारितोषिक विजेते डॉ. बारुच ब्लमबर्ग यांचा हाच जन्म दिन आहे. हा आजार होऊ नये यासाठी, जागरूकता, वेळेवर तपासणी व लसीकरण प्रभावी अस्त्रे आहेत, असे मत गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट व लिव्हर ट्रांसप्लांट फिजिशियन डॉ. पीयूष मारुडवार यांनी व्यक्त केले. हेपाटायटिस बी लसीकरण सुरक्षित व प्रभावी असून उपलब्ध असते. सुरक्षित रक्त संक्रमण व इंजेक्शन पद्धती, इंजेक्शनद्वारे अमली पदार्थ घेणाèयांसाठी हानी-नियंत्रण कार्यक्रम, उच्च धोका असलेल्या गटांसाठी नियमित तपासणी व लवकर निदान, हे प्रतिबंधक उपाय आहेत.hepatitis-b भारत व इतर निम्न व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये निदान व उपचाराच्या अडथळ्यांवर मात करणे अत्यावश्यक आहे. बरेच रुग्ण उशिरा समोर येतात, जेव्हा यकृताचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले असते. किफायतशीर औषधांची उपलब्धता वाढवून व हेपाटायटीस तपासणीला नियमित आरोग्य तपासणीचा भाग बनवून हे अंतर कमी करता येऊ शकते.
Powered By Sangraha 9.0