नागपूर,
lepidopteran-taxonomy राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र शैक्षणिक विभागात 'लेपीडाॅप्टेरन टाॅक्झोनाॅमी' या विषयावर एक दिवसीय व्याख्यानमाला शनिवार दिनांक २६ जुलै रोजी पार पडली. या शैक्षणिक उपक्रमात तज्ज्ञ वक्त्यांनी कीटक वर्गीकरणाच्या पारंपरिक व आधुनिक पद्धतींबद्दल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. टी. धुर्वे यांनी भूषविले तर, व्याख्याते म्हणून केटीएचएम कॉलेज नाशिक येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन गुरुळे, आरएनसी आर्ट्स, जेडीबी कॉमर्स आणि नाशिकच्या एनएससी सायन्स कॉलेज डॉ. अदिती सुनील शेरखरवार, एमजीव्हीचे लोेकनेते व्यंकटराव हिराय महाविद्यालय नाशिक येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अॅग्नेस जॉन खरात यांची उपस्थिती होती. या व्याख्यानमालेत डॉ. सचिन गुरुळे यांनी राष्ट्रीय पतंगा सप्ताह व कीटकांच्या पारंपरिक वर्गीकरण विषयी माहिती दिली. डॉ. अदिती सुनील शेर-खरवार यांनी कीटकशास्त्रातील आण्विक व एकात्मिक वर्गीकरण, नागरिक विज्ञान व संशोधनातील त्याचे महत्त्व विशद केले. डॉ. अॅग्नेस जॉन खरात यांनी प्राणीशास्त्र, वर्तनशास्त्र आणि पर्यावरण संवर्धनातील करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.lepidopteran-taxonomy कार्यक्रमाची सुरुवात विभागप्रमुख डॉ. व्ही. टी. धुर्वे यांच्या हस्ते स्वागत व रोपपूजनाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राची राठोड यांनी परीश्रम केले. या व्याख्यानमालेस एमएस्सीचे विद्यार्थी, संशोधन विद्यार्थी व सीएचबी शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.