बुलढाणा,
Molestation पिडीत मुलगी घरी एकटी असतांना बघून आरोपी अजय महाले याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश श्रीमती एम. व्ही देशपांडे यांनी दि. २८ जुलै रोजी सुनावली प्रकरणाची हकीकत पाडळी ता. बुलढाणा या गावी दि. १ ऑक्टोंबर २०२० रोजी पीडीत मुलगी घरी एकटी असतांना आरोपी अजय उर्फ रवि राजू महाले हा तिच्या घरासमोर आला व तुझे आई वडिल काका काकु कुठे गेले आहे असे विचारले घरी कोणी नसल्याचे त्याला समजता तो घरात शिरला व पिडीत मुलीला म्हटला मला किचन बघायचे आहे.

व वाईट उद्देशाने शरिराला स्पर्श करीत विनयभंग केला. घडलेला सगळा प्रकार पिडीत मुलींनी आई वडिलांना सांगितला व बुलढाणा ग्रामणी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आरोपी अजय महाले यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गंन गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पो. उपनिरीक्षक सुनिल दौड यांनी केला आरोपीविरूद्ध पुरावा मिळून आल्याने दोषारोप पत्र विशेष न्यायालय बुलढाणा येथे दाखल केले. Molestation सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी या प्रकरणामध्ये १० साक्षीदार तपासले जोरदार युक्तीवाद करून विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांनी न्यायलयासमोर सादर केल्याल्या पुराव्या वरून हे सिद्ध झाले आरोपीने पिडीतेच्या घरात जाऊन विनयभंग केला. न्यायालयासमोर उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून विशेष न्यायाधीश श्रीमती एम. व्ही. देशपांडे यांनी आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास तसेच एक हजारू रूपये दंड ठोठवला आहे दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हेड कॉन्सटेबल शेखर थोरात यांनी सहकार्य केले.