विद्यापीठात 'कॅरी ऑन' साठी गांधीगिरीने आंदोलन

    दिनांक :29-Jul-2025
Total Views |

नागपूर,

National OBC Students Federation राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदा ‘कॅरी ऑन’ची संधी न दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मागील वर्षी मिळालेली ही संधी यंदा परिपत्रक न काढता रद्द करण्यात आल्याने अंतिम वर्षाच्या प्रवेशाला अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.


gandhi  

 
यासंदर्भात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने सोमवार, २८ जुलै रोजी प्र-कुलगुरूंना गुलाबपुष्प देत गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला.National OBC Students Federation यावेळी जिल्हाध्यक्ष नीलेश कोढे, अध्यक्ष रितेश कडव, उपाध्यक्ष यश हजारे, दिलीप उज्जैकर, अमेय रोकडे आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना ATKT न मिळाल्याने आणि ‘कॅरी ऑन’ची सुविधा बंद झाल्याने वर्ष वाया जाणार असल्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सौजन्य :अंशुल जिचकार,संपर्क मित्र