पालक प्रतिनिधी निवडीसाठी पालक सभा संपन्न

    दिनांक :29-Jul-2025
Total Views |
नागपूर,
New English High School न्यू इंग्लिश हायस्कूल, काँग्रेस नगर (हायस्कूल विभाग) येथे इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी साठी पालक प्रतिनिधी निवडण्यासाठी पालक सभा आयोजित करण्यात आली. पडळकर यांनी PPT सादरीकरणातून शाळेचे नियम व उपक्रम मांडले. फुंडे यांनी परीक्षा नियोजन, तर मुरकुटे यांनी शाळाबाह्य परीक्षांची माहिती दिली.

deshpande 
 
 मुख्याध्यापक . रंगारी यांनी शाळेचा इतिहास व वैशिष्ट्ये सांगितली. पालक प्रतिनिधींची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला.New English High School वेळेआधी येणाऱ्या पालकांना भेटवस्तू देण्यात आल्या.सभेचे संचालन महाजन, तर आभार प्रदर्शन . अघोर यांनी केले. ८० पालक उपस्थित होते. शेवटी कल्याण मंत्र व नाश्त्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
सौजन्य:चित्रा देशपांडे,संपर्क मित्र