वन उमरी गावात अज्ञात रोगाचा फैलाव

29 Jul 2025 16:37:30
मानोरा, 
unknown-disease तालुयातील उमरी खुर्द गट ग्रामपंचायत मधील वन उमरी (रंगपटी) या गावात जनावरांमध्ये अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रोगाची लागण झाल्याने गाई, वासरे व बैल आजारी पडत असून, काही जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
गावात सुमारे २५० हून अधिक जनावरे असून, येथील बहुतांश नागरिक गाई व म्हशी पाळून आपला उदरनिर्वाह चालवीत आहे.
 
 

जनावर  
 
 
अचानक अज्ञात रोगाचा फैलाव झाल्याने सहा जनावरे दगावल्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील आकाश राठोड यांची एक गाय, रामचंद्र चव्हाण यांचा एक बैल, काशीराम हळके यांची एक गाई व इतर तीन जनावरे अज्ञात रोगाचे लागणीतून मृत्यूमुखी पडली आहेत. मृत जनावरांची संख्या एकूण सहावर पोहोचली आहे.पशुपालक साहेबराव राठोड यांनी सांगितले की, पशुवैद्यकीय विभागाने वेळेवर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून दिली असती तर आज ही वेळ आली नसती. आम्ही वेळोवेळी तक्रार केली, पण कोणीही आमच्या मागणीकडे लक्ष दिल नाही.
दरम्यान, या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, वाशीम येथून लस आणण्यात आली असून, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोम यांच्या नेतृत्वाखालील चमू वन उमरी गावात पोहोचली आहे. त्यांनी आजारग्रस्त जनावरावर उपचार सुरू केले आहेत. डॉ. रोम यांनी सांगितले की, सध्या गावात उपचार सुरू असून, रोग पसरू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. सर्व पशुपालकांनी सतर्क राहून जनावरांमध्ये कोणताही त्रास दिसताच त्वरित माहिती द्यावी. या घटनेमुळे वन उमरी गावात भीतीचे वातावरण पसरले असून, रोग आटोयात आणण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
Powered By Sangraha 9.0