गोंदिया,
paddy-cultivation जिल्ह्यात जुलैच्या दुसर्या आठवड्यात पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर धान रोवणीच्या कामांना वेग आला. जिल्ह्यात धानाचे प्रत्येक्ष पेरणी क्षेत्र १ लाख ८५ हजार ८८४ हेक्टर लागवड क्षेत्रापैकी १ लाख ३५ हजार १४ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड झाली आहे. पैकी ९३५६.६ हेक्टर क्षेत्रात आवत्या पद्धतीने तर १ लाख २५ हजार ६५८ हेक्टरवर रोवणी पद्धतीनी धान लागवड करण्यात आली आहे. धान लागवडीच्या टक्केवारीचा विचार केल्यास ८०.३२ टक्के आहे. एकूण पिकाची लागवड टक्केवारी ८०.०८ आहे. जिल्ह्यातील शेतकरी लागवड क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धानाचे उत्पन्न घेतात.
येथील जयश्रीराम, केशर, कालीमुछ, सुंदरी, वर्षा हे धानाचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्या गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे खरीप धान पीक लागवड पुर्णत्वाकडे आहे. पारंपरिक, सुधारित, संशोधित बियाणे अशा तिन्ही वाणांची शेतकर्यांनी लागवड केली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर धानाची लागवड केली जाते. धानाचे सर्वसाधारण क्षेत्र १६८१००.८३ हेक्टर आहे. तर प्रत्येक्ष १८५८४४ हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे. आतापर्यंत १ लाख ३५ हजार १४ हेक्टरवर धानाची लागवड झाली आहे. पैकी ९३५६.६ हेक्टर क्षेत्रात आवत्या पद्धतीने धान लागवड झाली आहे. अशी ८०.३२ टक्के क्षेत्रात धान पिकाची लागवड झाली आहे. ४१.४४ हेक्टर मक्याचे लागवड क्षेत्र असून केवळ १०.४० हेक्टर क्षेत्रातच मका लागवड झाली आहे. तुरीच्या ५८२७.६२ हेक्टर पैकी ४४६८.८० हेक्टरवर लागवड झाली आहे.paddy-cultivation मूग ३.२० हेक्टर, इतर कडधान्य २३७० हेक्टर क्षेत्रावर, तीळ ५९०.९६ हेक्टर क्षेत्रात, ऊस ६३.१० हेक्टरमध्ये, कापूस २ हेक्टर, यंदा पालेभाज्यांच्या क्षेत्रात अडीचशे हेक्टरने वाढ होत ९९९.४३ हेक्टरमध्ये लागवड आहे. हळदीचे क्षेत्रही वाढले असून ३३८.२० हेक्टर झाले आहे. आल्याच्या क्षेत्रातही वाढले असून ८२.८० हेक्टरवर लागवड झाली आहे. केळी, पपईचे क्षेत्र थोडे घटले आहे. यंदा १०.८० हेक्टर पपई, केळीची लागवड झाली आहे. इतर पीके १४.२० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पीक लागवड क्षेत्राच्या १४१४२२.७५ हेक्टर क्षेत्रात वरील पीकांची लागवड झाली असून टक्केवारी ८०.०८ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७०१.७ मिमी म्हणजेच १२०.८ टक्के पाऊस झाला आहे.