नागपूर ,
Rashtrasevika Samiti राष्ट्रसेविका समिती देवयानी शाखेच्या "धृती" या हस्तलिखिताचा प्रकाशन सोहळा रजत हायस्कूलच्या नटराज सभागृहात संपन्न झाला. प्रसिद्ध लेखिका प्रीती वडनेरकर यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात स्वाती मोहनी यांच्या शारदा स्तवनाने झाली. बालसेविकांनी अतिथींना संचलनाद्वारे अंक सादर केला. संपादिका दिपाली देशमुख यांनी "धृती"तील विविध लेख, कविता, मुलाखत आणि सजावटीवर प्रकाश टाकला.
प्रमुख पाहुण्या प्रिती वडनेरकर यांनी हस्तलिखिताची तुलना दर्जेदार दिवाळी अंकाशी करत कौतुक केले. लेखिकांना रोपटे भेट देत सत्कार करण्यात आला.Rashtrasevika Samiti मागील वर्षीच्या अंकातील निवडक लेखांचा ‘राष्ट्रसेविका २०२५’ अंकात समावेश झाल्याबद्दल डॉ. स्वाती मोहरीर व मुक्ता रानडे यांचा सन्मान झाला.वसुधा पांडे यांनी अंकाचा ४६ वर्षांचा प्रवास उलगडला. लेखन, रचना, सजावट करणाऱ्या सर्व सेविकांचे आणि मार्गदर्शकांचे विशेष कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता मीरा शहापूरकर यांच्या पसायदानाने झाली. अध्यक्ष महिमा सालोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेविकांनी परिश्रम घेतले.
सौजन्य: डॉ. स्वाती मोहरीर,संपर्क मित्र