गुणवंतांचा सत्कार आणि बुक बँकेचे लोकार्पण

    दिनांक :29-Jul-2025
Total Views |

नागपूर,

shri-siddhivinayak-seva-trust- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट आणि भाजप प्रभाग १६ ड यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बुक बँक लोकार्पण सोहळा सायंटिफिक सभागृहात पार पडला.आमदार संदीप जोशी यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कार्यक्रमात बारावी आणि इतर शाखांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ‘बुक बँक’ उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत दिली जाणार आहे.


gajanana  

प्रमुख पाहुण्यांमध्ये भाजप नेते संजय नाथे, सुषमा सराफ, नरेंद्र वानखेडे, तसेच माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध मान्यवर उपस्थित होते.shri-siddhivinayak-seva-trust कार्यक्रमात ‘करिअरच्या वाटा’ या विषयावर मार्गदर्शनही करण्यात आले.सूत्रसंचालन मनोज देशपांडे तर आभार प्रदर्शन नीरज दोंतुलवार यांनी केले. विविध क्षेत्रातील स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी संयोजनात मोलाचे सहकार्य केले.
सौजन्य:गजानन निशितकर ,समपर्क मित्र