सिंदी (रेल्वे),
chandrashekhar-bawankule : शहरात चार दशकांपासून ठाण मांडून बसलेले बांगलादेशी घुसखोरांना त्वरित हटवण्याची कारवाई करा, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २८ रोजी वर्धा जिल्हा प्रशासनाला दिले.
सिंदी शहराला लागून असलेल्या परसोडी शिवारात मोडणार्या वन जमिनीवर अतिक्रमण करुन वास्तव्यास असलेल्या अडीचशे रोहिंग्यांना त्वरित हटवावे आणि या नगरीला मोकळा श्वास घेऊ द्या, अशी विनंती करण्यात आली. ना. चंद्रशेखर बावनकुळे आणि ना. डॉ. पंकज भोयर यांना बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तसेच भाजपाचे पदाधिकारी आमदार समीर कुणावार यांच्या माध्यमातून भेटले.
तसेच बैठकीला उपस्थित भाजपाच्या शहराध्यक्ष अजया साखळे, जिल्हा सचिव स्नेहल कलोडे यांनी देखील मंत्री महोदयांना या संदर्भात साकडे घातले होते. बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार जोमाने प्रयत्न करीत आहे. परंतु, येथील बांगलादेशी प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही, असा सवाल ना. बावनकुळे यांनी जिल्हाधिकार्यांना विचारला.
रोहिंंग्यामुळे शहराची शांतता भंग होत असून सामान्य नागरिक प्रचंड वैतागले असल्याचे विहिंप व बजरंग दलाच्या पदाधिकार्यांनी निदर्शनास आणून दिले.
या पूर्वीच्या तक्रारींची दखल घेत ना. बावनकुळे यांनी महसूल विभाग, जिल्हा प्रशासनाने पोलिसांची मदत घेऊन ही घाण त्वरित हटवावी, असे निर्देश दिले. यावेळी यश बालपांडे, कुणाल भोयर, रतनसिंग चव्हाण, आकाश सिर्सीकर, मंगेश चंदनखेडे, राहुल मोटे, दत्ता चव्हाण, मंथन कारणकर, अमित बोंगाडे व भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.