नागपूर,
create-shivlingas लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशनने माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर प्राचीन शिव मंदिरात श्रावण मास महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. या श्रावण मासात मातीच्या 71 लाख शिवलिंगांच्या सृजनाचा संकल्प करण्यात आला आहे.
आज सोमवारी सकाळी 9 वाजता गंगेच्या पवित्र मातीतून शिवभक्तांनी 4,44,748 मातीची शिवलिंगे बनवली. सोनू तिवारी, अंशु तिवारी, रिद्धी तिवारी, आयु तिवारी यांच्या हस्ते रुद्राभिषेकाच्या 11 आवर्तनात पार्थिव शिवलिंगाची पूजा सुरू झाली. अभिषेकानंतर, मुलांपासून पालकांपर्यंत व मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी दयाशंकर तिवारी यांच्यासह यात सहभाग घेतला.
विशेषतः बी. जी. श्रॉफ गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 51 विद्यार्थिनी व शिक्षकांनी 3 तासांत शिवलिंगे बनवली. दयाशंकर तिवारी म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्य संवर्धनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा याच संदर्भात एक प्रयत्न होता. इतर शाळा व महाविद्यालयेदेखील संपर्क साधू शकतात.
शिवलिंग बनवताना, संजीवनी, गायत्री, महामृत्युंजय मंत्र जप निरंतर चालू राहिला.सायंकाळी शशिशंकर शुक्ला, सुमन शुक्ला, उर्मिला शुक्ला, उदय शंकर शुक्ला, भावना शुक्ला, डॉ. विनायक मिश्रा, सुनील अग्रवाल, अजय करोसिया, शिशिर त्रिपाठी, तन्मय राखडे, क्षीतिज तिवारी, मृणाल पवनीकर, अंशुल साखरे, गजवक्र संस्थेचे नील कान्हेरे, संपन पांडे, युग पात्रीकर यांनी अभिषेक, आरती केल्यानंतर कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.create-shivlingas अमर खोडे, शशिकांत हरडे, अमित मिश्रा, प्रीती कश्यप, पं. मनोज पांडे, प्रशांत गुप्ता, अनिल बावनकर, विनय कडू, विनीत पाठक, सागर घाटोळे, रेखा वांदे, सीमा कश्यप, सिमरन कौर, वर्षा भड, नवीन जैन, रोशन राहाटे, अनिल जोशी, सुरेश सोमकुवर, संतोष यादव आदी उत्सवासाठी परिश्रम घेत आहेत. सकाळी मातीचे शिवलिंग निर्माण व पूजा, अभिषेक, आरतीनंतर विसर्जन, असे नित्यनेमाने 24 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
-----------------------------------