राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाचा पर्यटन विशेष पॅकेज उपक्रम

29 Jul 2025 17:14:08
बुलढाणा,
State Transport Corporation महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागातर्फे सर्व आगारांमधून पर्यटकांसाठी विशेष पॅकेज यात्रा आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक तसेच विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे.
 
 
bus
 
या पॅकेज यात्रा अंतर्गत एक दिवसापासून ते तीन दिवसांपर्यंतच्या देवदर्शन आणि पर्यटनस्थळांच्या भेटीचा समावेश आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकींगद्वारे ही सेवा राबविण्यात येणार असून, सर्व आगारांमधून नियोजित स्थळांकरिता वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. State Transport Corporation एक दिवसांचे पॅकेज यात्रा: अजिंठा लेणी-वेरुळ घृष्णेश्वर-खुलताबाद-, पैठण प्रवाशांच्या विशेष मागणीनुसार मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर व उज्जैन या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांसाठी देखील वाहतूक सेवा पुरविण्यात येईल. या पॅकेज यात्रेची माहिती, शुल्क, प्रवासाचे वेळापत्रक, बुकिंग प्रक्रिया इत्यादी तपशीलासाठी आपल्या नजीकच्या एस. टी. आगारास भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0