गोरेगाव,
surfies-singing-tradition तालुक्यातील सटवा येथे नागपंचमीनिमित्त ‘सर्फी’ गायन व वारूळ पूजनाची परंपरा दीडशे वर्षांपासून पाळली जात आहे. विशेष म्हणजे, सर्फी दीक्षा घेतलेल्यांनीच सर्फी गायन व वारूळ पूजन केल्यावर गावात घरोघरी नागपुजन केले जाते. कालानुरूप बदल झाले असले तरी धार्मिक सण व उत्सवाचे महत्व आजही कामय असून आजही अनेक ठिकाणी शेकडो वर्षाच्या परंपरेनुसारच सण व उत्सव साजरे केले जात असल्याचे दिसते. नागपंचमी हा सण मोठा नसला व फक्त सापापर्यंतच मर्यादित असला तरी या सणाला ग्रामीण भागात अमर्यादित महत्व असल्याचे दिसून येते.

गोरेगाव तालुक्यातील सटवा येथे नागपंचमीनिमित्त ‘सर्फी’ गायन व वारूळ पूजनानंतरच गावात पूजनाची दीडशे वर्षांपासूनची परंपरा कायम आहे. ‘सर्फी’ म्हणजे नाग देवताच्या संबंधाने असलेले गाणे होय. गावात आधीपासून गुरु मानलेल्या व्यक्तीच्या येथे नाग देवताचे ‘ठाण’ राहते. त्या ठिकाणी ‘सर्फी’ची दीक्षा घेतलेले गावातील व्यक्ती जमा होतात. त्यानंतर ‘सर्फी’ गायन करीत ही मंडळी गावातील सीमेत असलेल्या वारुळाचे ‘सर्फी’ गायन करून पूजन करतात. त्यानंतर गावातील सर्व मंदिरात ‘सर्फी’ गायन करीत पूजा केली जाते आणि त्यानंतरच गावकरी आपआपल्या परीने नागदेवताची पूजा करतात. ‘सर्फी’ गायन व वारूळ पूजनाची परंपरा ही मागील पाचवी पिढीपासून म्हणजेच जवळपास दीडशे वर्षांपासून असल्याचे सांगितले जाते. ही परंपरा आजही कायम असली तरी काळाच्या ओघात, आधुनुकीकरणात नवीन पिढी पुढे येत नसल्याने ही परंपरा जतन करणारी ही पिढीच शेवटची तर ठरणार नाही ना? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
‘सर्फी’ म्हणजे काय?
‘सर्फी’ म्हणजे नागदेवता संबधित मंत्र किंवा त्यासंबंधित गाणे होत. यांना एक विशिष्ट चालीने गायिले जाते. ‘सर्फी’ गायनसाठी विशिष्ठ पद्धतीने दीक्षा घेतली जाते.surfies-singing-tradition दीक्षा घेतलेल्या व्यक्तींना काही विशेष नियम व पथ्य पाळावी लागतात. ज्या व्यक्तीने संबंधित दीक्षा घेतली असेल त्यालाच ‘सर्फी’ गायन व वारूळश्र पूजनाचा अधिकार असतो.
आमच्या आधीच्या पाच पिढ्या म्हणजेच जवळपास दीडशे ते दोनशे वर्षांपासूनची ही परंपरा गावात आहे. यात फक्त ‘सर्फी’ची दीक्षा घेतलेल्यांनाच ‘सर्फी’ गायन करता येते. सर्फी गायन व पुजनानंतरच गावात नागदेवतेची पुजा केली जाते.
- भोजराज बघेले
गावकरी, सटवा