वर्धा,
teachers-hunger-strike : जिल्हा परिषद शिक्षकांमधून केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती व्हावी, यासाठी मे महिन्यापासून स्वतंत्र समता शिक्षक संघटनेचा निवेदनाद्बारे पाठपुरावा सुरू आहे. परंतु, जिल्हा शिक्षण विभागाने पदोन्नतीसाठी आजपर्यंत चालढकलच केली. पुढे आचारसंहिता व जनगणनेचा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे पदोन्नती प्रक्रिया हे पूर्णतः थांबणार असल्याची भीती शिक्षकांमध्ये आहे. दरम्यान, जिप समोर मंगळवार २९ पासून गौतम पाटील यांच्या नेतृत्वात स्वतंत्र समता शिक्षक संघाने उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणास प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष लोमेश वराडे, जिल्हाध्यक्ष अरुण झोटिंग, कार्याध्यक्ष अजय गावंडे, जुनी पेन्शन संघटनेचे सरचिटणीस प्रमोद खोडे, स्वतंत्र समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष सुनील तेलतुंबडे, सेवानिवृत्त संघटनेचे राजू थूल, बामसेफचे जिल्हा संयोजक जानराव ठोंबरे, शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे मनोहर खोब्रागडे यांनी पाठींबा दिला.
पहिल्या दिवसाच्या उपोषणावेळी शितल बाळसराफ, पुष्पराज झिलटे, सचिन शंभरकर, संजय मून, सुनील कोल्हे, अजय कुंभारे, सूरज गणवीर, गंगाधर भगत, पुष्पराज झिलटे, सुभाष वनकर, आशिष बोटरे, नीलेश चौधरी, अतुल भातुकुलकर, दीप नाखले, विक्रम तामगाडगे, सुधाकर जुनघरे, गौतम वाकोडे, सचिन हाडके, निखिल भगत, पिंकी सहारे, शाहरुख शेख, प्रयोग तेलंग, सचिन शंभरकर, चरणदास चारभे, आशिष फरकाडे, योगेश्वर खेवले, आदींनी सहभाग घेतला.