वाशीम,
robbed-in-tirupati-city घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी एका घरामधून तीन लाख रुपये रोख आणि तेरा लाखाचे दागीने असा सोळा लाख रुपयांचा एवज लंपास केल्याची घटना आज, २९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील गजबजलेली वसाहत असलेल्या तिरुपती सिटी मध्ये वास्तव्यास असलेले सुनील नामदेव राऊत हे तीन ते चार दिवसापासून बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी सुनील राऊत यांच्या घरामधील तीन लाख रुपये रोख आणि तेरा लाख रुपयांचे दागीने असा एकूण सोळा लाख ऐवज लंपास केला. यासंदर्भात सुनिल राऊत यांनी वाशीम शहर पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे.robbed-in-tirupati-city गेल्या काही दिवसांपासून वाशीम शहर व जिल्ह्यात चोरीच्या घटनात वाढ होत असतांना पोलिस चोरट्यांचा तपास लावण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी शहरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात एवढी मोठी चोरी झाल्यामुळे नागरीक भयभीत झाले आहेत.