bitten-by-snakes एकीकडे नागपंचमीच्या दिवशी नागोबा मंदिरात नागाची पूजा सुरू असताना दुसरीकडे दोघांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. यातील पहिली घटना कारंजा तालुयातील जयपूर येथे घडली.
२९ जुलै रोजी सकाळी ९ वाजताचे दरम्यान घडलेल्या या घटनेत राहत्या घरी सुशीलाबाई काशिनाथ डांगे वय ३० या महिलेला सापाने दंश केला. तर दुसरी घटना मानोरा तालुयातील म्हसनी येथे मंगळवारी सकाळी घडली. या घटनेवेळी प्रकाश महादेव गावंडे वय ६० यांना सर्पदंश झाला. घटनेनंतर उपरोक्त दोघांनाही उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्यपरिस्थितीत उपरोक्त दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांचेवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयातील नोंदीवरून प्राप्त झाली आहे. तर दुसरीकडे २८ जुलै रोजी दुपारी देखील सर्पदंशाच्या दोन घटना घडल्या. यातील पहिली घटना कारंजा तालुयातील भाडशिवणी येथे घडली. यावेळी राहत्या घरी राजेंद्र वसंतराव जाधव या ५२ वर्षीय व्यक्तीला सापाने चावा घेतला. तर दुसरी घटना कारंजा तालुयातील शेलूवाडा शेतशिवारात घडली.bitten-by-snakes या घटनेत शेतात काम करीत असताना गोपाळराव केशव मोडक वय ६५ यांना सर्पदंश झाला. उपरोक्त दोघांनाही उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यातील एकावर उपचार सुरू आहेत तर दुसर्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील नोंदीवरून प्राप्त झाली आहे. उपरोक्त चौघांनाही सर्पदंश झाल्याची माहिती कुटुंबीयांनी उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात दिली. नागपंचमीच्या दिवशी आणि आदल्या दिवशी दोघांना सर्पदंश झाल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.