ट्रक मधील अडीच कोटीच्या वॅक्सीन बॉक्सची चोरी

29 Jul 2025 17:24:59
कारंजा लाड,
Vaccine box भिवंडी येथून नागपूर रायपूर मार्गे कलकत्ता येथे जाणार्‍या ट्रक मधील अ‍ॅबोट हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड भिवंडी या कंपनीचे ४६ वॅक्सीन बॉक्स चोरी गेल्याची घटना समृद्धी महामार्गावरील कारंजा जवळ तीन दिवसापूर्वी घडली. घटनेनंतर चालकाने ११२ क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. त्यामुळे पोलिसांनी ट्रक ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आणून लावण्यात आला.
बॉस
 
washim
 
ट्रान्सपोर्टर मनोज शर्मा रा. मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार महेश कार्गो मुव्हर्स ट्रान्सपोर्टचा एम. एच. ०४ जे. के. ७०५४ क्रमांकाचा कार्गो ट्रक भिवंडी येथून नागपूर रायपूर मार्गे कलकत्ता येथे व्हॅसिन बॉक्स घेऊन जात असताना समृद्धी महामार्गावर कारंजा जवळ त्या ट्रक मधील ४६ व्हॅसिन बॉक्स चोरीला गेले. ट्रक मध्ये एकूण ४०८ व्हॅसिन बॉक्स होते. ज्याची किंमत जवळपास १९ कोटी रुपयांच्या आसपास आहे. Vaccine box तर चोरीला गेलेल्या ४६ व्हॅसिन बॉक्सची किंमत २ कोटी ५० लाख रुपयांच्या घरात असल्याची माहिती ट्रान्सपोर्टरने दिली. वृत्त लिहेपर्यंत कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
 
 
पोलिसांनी एम. एच. ०४ जे. के. ७०५४ क्रमांकाचा ट्रक कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आणून लावण्यात आला आहे. तपासासाठी दोन आठवड्याचा वेळ असल्याने विहित मुदतीत तपास पूर्ण केल्या जाईल.
प्रवीण शिंदे, ठाणेदार ग्रामीण पोस्टे
Powered By Sangraha 9.0