नागपूर,
vikas-sirpurkar : भारतीय समाज हा पूर्वीपासूनच तू आणि मी एकच या विचारांची कास धरून गुण्या गाेविंदाने नांदत आला. परंतु वर्तमानात समाजतील दुभंग वाढला आहे. जात-धर्मातील श्रेष्ठ कनिष्ठता घरांतूनच मुलांच्या मनात बिंबविली जात आहे. हा प्रकार थांबून पालकांची मने आधी स्वच्छ नितळ हाेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.
आर. ए. रुईकर इन्स्टिट्यूट ऑफ लेबर अँड साेशिओ कल्चरल स्टडीजच्या वतीने आयाेजित समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ः भारतीय जनतेच्या आकांक्षापूर्तीचे सूत्र विषयावर आयाेजित चर्चासत्रात प्रमुख वक्ता म्हणून ते बाेेलत हाेते. व्यासपीठावर विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डाॅ. तेजिंदर सिंह रावल, डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डाॅ विद्या चाैरपगार उपस्थित हाेते. अध्यक्षस्थानी रुईकर संस्थेचे संचालक डाॅ श्रीनिवास खांदेवाले हाेते.
समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द आणिबाणीच्या काळात राज्यघटनेत जाेडण्यात आले. त्यामुळे ते आता काढण्यात यावे अशी मागणी काही लाेक करीत आहे. या विषयाचा उहापाेह करण्यासाठी सदर चर्चासत्र आयाेजित करण्यात आले हाेते. आपल्या विवेचनात डाॅ. चाैरपगार म्हणाल्या, संविधानात हे शब्द पूर्वी नव्हते याचा अर्थ समाजावादी दृष्टीकाेन आणि धर्मनिरपेक्षता राज्यघटनेत प्रतिबिंबित नव्हती असा अर्थ हाेत नाही. संविधानाच्या प्रास्ताविकाची सुरुवातच आम्ही भारताचे लाेक या शब्दांनी हाेत असल्याने समानता हे मूलतत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
डाॅ रावल म्हणाले, आज भारतीय अर्थव्यवस्था विकसित हाेत असली तरी आजही 80 टक्के संपत्ती ही 20 टक्के लाेकांकडे एकवटली आहे. त्यामुळे ही असमानताच समाजाला विभाजित करीत आहे. हे असमानता कमी करण्यासाठी समाजवाद अंगिकारणे ार आवश्यक झाले आहे. सर्वच नागरिकांनी एकमेकांना समान समजण्याचा विवेकनिष्ट दृष्टीकाेन वृद्धिंगत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात डाॅ. खांदेवाले म्हणाले, हे दाेन शब्द घटनेतून काढण्याबाबतच्या सर्वच याचिका न्यायालयाने खारीज केल्या आहेत. या मागण्या आज हाेत आहे याचा अर्थ समाज म्हणून आपण कुठे जाताेय याचा विचार करण्याची गरज त्यांनी अधाेरेखित केली. प्रास्ताविक रमेश पाटणे यांनी केले. चर्चासत्राला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते.