नवी दिल्ली
Ramayanam first look पाच हजार वर्षांपूर्वी घडलेल्या रामायणाची अमरगाथा आता नव्या रूपात जगासमोर येणार आहे. जगभरातील २.५ अब्जांहून अधिक लोक जिचा आदर करतात, अशी ही कथा पहिल्यांदाच दोन भागांत, भव्य अशा लाईव्ह-अॅक्शन सिनेमॅटिक विश्वात सादर होत आहे. ‘रामायणम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करत असून, निर्मिती प्राइम फोकस स्टुडिओचे नमित मल्होत्रा, सुपरस्टार यशची मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स आणि आठ वेळा ऑस्कर पुरस्कार विजेते व्हीएफएक्स स्टुडिओ डीएनईजी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
रामायणाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत आणि दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत जगभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी आयमॅक्ससारख्या प्रगत फॉरमॅटमध्ये शूटिंग सुरू आहे. ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ या विशेष जागतिक लाँच कार्यक्रमाद्वारे या सिनेमॅटिक विश्वाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. या निमित्ताने भारतातील नऊ प्रमुख शहरांमध्ये एकाचवेळी स्क्रीनिंग झाले, तसेच न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये भव्य बिलबोर्ड टेकओव्हर करण्यात आला.
चित्रपटात Ramayanam first look रामाची भूमिका रणबीर कपूर, रावणाची यश, सीतेची साई पल्लवी, हनुमानाची सनी देओल तर लक्ष्मणाची भूमिका रवी दुबे साकारत आहेत. संगीत क्षेत्रातही ऐतिहासिक घडामोड घडली असून, ऑस्कर विजेते हंस झिमर आणि ए.आर. रहमान प्रथमच एकत्र या चित्रपटाचं संगीत देत आहेत.
चित्रपटात Ramayanam first look राम आणि रावण यांच्यातील संघर्ष, मानवी मर्यादा आणि दैवी शक्ती यामधील टोकाचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. रावणाच्या रूपाने जन्मलेली अकल्पनीय शक्ती आणि त्या विरोधात विष्णूचा मानवस्वरूपातील अवतार – राम यांच्या संघर्षाची ही महाकाव्यात्मक कथा आहे.हॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंटदिग्दर्शक टेरी नोटरी आणि गाय नॉरिस यांनी चित्रपटातील युद्धदृश्यांचं कोरियोग्राफी केलं आहे. प्राचीन भारताचा भव्यतेने साकारलेला देखावा प्रोडक्शन डिझायनर्स रवी बन्सल आणि रॅमसे एव्हरी यांच्या कल्पकतेतून आकाराला आला आहे.‘रामायणम’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर भारतीय संस्कृतीतील अमर गाथेला नव्या युगातील आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या भक्कम एकत्रित प्रयत्नातून उभं राहिलेलं हे विश्व आजवरचा सर्वात भव्य सिनेमॅटिक अनुभव देईल, असा विश्वास चित्रपट निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.