मूड चांगला करण्यासाठी उपाय

03 Jul 2025 13:42:34
नवी दिल्ली,
smile your face उदास वाटतं का ? मग सिरोटोनिन  या हार्मोनच्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या हार्मोनमुळे चिंता कमी होऊन मूड चांगला होण्यास मदत होते, भूकेवर नियंत्रिण येतं व आनंदी राहण्याचं उत्तेजन मिळतं. म्हणून जर उदास वाटत असेल तर मेंदूत हा हॅपी हार्मोन स्त्रवण्यासाठी खालील उपाय नक्की ट्राय करा.
 
 
मूड
 
 
 
मसाज- घेतल्याने खूप मोकळं वाटतं. त्यामुळे प्रत्येकालाच मसाज घेणे आवडते. तसेच मसाज घेतल्याने सिरोटोनिन च्या वाढीस चालना मिळते व त्यामुळे दुःख दूर होऊन प्रसन्न वाटतं, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
दूध-पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुधात असलेल्या α-लॅक्टॅल्ब्युमिन मुळे सिरोटोनिन ची निर्मिती होते. α-लॅक्टॅल्ब्युमिन युक्त कोणत्याही आहाराने मूड सुधारण्यास मदत होते.
झोप-अपुरी झोप घेऊ नका. अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे, झोपेचा व सिरोटोनिन चा संबंध असतो. त्यामुळे मूड चांगला ठेवण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या.
हळद-मध्ये असलेल्या कर्क्युमिन यात अँटीडिप्रेसन्ट गुणधर्म असतात. म्हणून कोमट दुधात हळद घालून घेतल्याने चटकन मूड सुधारतो.
काळामिरी-मध्ये पाईपरिन नावाचे ऍक्टिव्ह कंपाऊंड असते.smile your face ते सिरोटोनिन च्या निर्मितीस अडथळा आणणारे एंझ्याइम्स ब्रेक करते.
व्यायाम- सिरोटोनिन स्त्रवण्याचा उत्तम उपाय म्हणजे व्यायाम करणे. म्हणून नियमित व्यायाम करा आणि प्रसन्न रहा.
Powered By Sangraha 9.0