बुलढाणा,
Sharad Sonawane जुन्नर विधानसभा मतदार संधाचे आ. शरद सोनवणे यांनी फासे पारधी आणि रामोसी या अनुसूचित जमातीचा चोर आणि गुन्हेगार जमाती असे संबोधुन त्यांचा जाहीरपणे अपमान केला आहे. तसेच आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके यांना जाहीरपणे आदिवासी खात्याला मूर्खमंत्री भेटला आहे चोर साला अशा शब्दात जाहीर अपशब्द बोलुन अपमान केला आहे. या घटनेचा तिव्र निषेध करून त्यांच्यावर अॅक्ट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी विकास परिषद व समाजाचे वतीने निवेदन जिल्हाधिकारी किरण पाटील यांना दि. ३० जुलै रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमुद केेल्याप्रमाणे आ. शरद सोनवणे यांच विरुध्द तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण या वक्तव्यामुळे फासे पारधी आणि इतर अनुसूचित जमातीमध्ये तिव्र संताप पसरला आहे. शरद सोनवणे यांच्या विरुध्द स्थानिक पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात यावा. या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. Sharad Sonawane आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात. सुशिक्षीत विदयार्थ्यांवर समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय गुन्हे दाखल करण्यात येवु नये.फासे पारधी हा आदिवासी संवर्गात मोडतो परंतु त्यांना शेतजमीन किंवा घर बांधण्यासाठी जागा मिळत नाही. तरी शासनाने विनाअट उपलब्ध करुन देण्यात यावी यासह इतर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर विकास परीषद जिल्हाध्यक्ष युवराज पवार, राजेंद्र पवार, राजेश पवार, शेषराव पवार नितीन पवार यांच्यासह पारधी समाज बांधवाच्या स्वाक्षर्या आहेत.