अडीच लाखांहून अधिकांना रोजगाराची संधी

30 Jul 2025 14:30:50
नोएडा,
Bharat Viksit Rozgar Yojana आगामी दोन वर्षांमध्ये सेवा आणि उत्पादन क्षेत्रात किमान साडेतीन लाख नागरिकांना रोजगार मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेंतर्गत नोकरीत रुजू होणाऱ्या आणि ज्यांचे ईपीएफओमध्ये पहिल्यांदाच युएएन (UAN) क्रमांक तयार होईल, अशा कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून पहिल्या महिन्याचा पगार (कमाल 15 हजार रुपये) दोन हप्त्यांमध्ये दिला जाणार आहे.
 

 Bharat Viksit Rozgar Yojana 
या योजनेचा लाभ फक्त कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर त्यांना नोकरीवर ठेवणाऱ्या उद्योजकांनाही मिळणार आहे. यासाठी कर्मचारी भविष्य निधी विभाग आणि जिल्हा उद्योग व उद्यम प्रोत्साहन केंद्र हे एकत्रितपणे जनजागृती आणि अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत.ही योजना म्हणजे पंतप्रधान भारत विकसित रोजगार योजना (ELI) असून ती येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून देशभर लागू होणार आहे. त्याआधी नोएडा जिल्ह्यात नियोक्ते आणि कामगार यांच्यासाठी जागरूकता मोहीम राबवली जात आहे.
 
 
नोएडा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर संधी
नोएडामध्ये Bharat Viksit Rozgar Yojana  सुमारे 60 हजार सेवा क्षेत्रातील कंपन्या आणि 30 हजार उत्पादन क्षेत्रातील युनिट्स कार्यरत आहेत. 50 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची संख्या असलेल्या युनिटमध्ये किमान 5 कर्मचाऱ्यांना आणि 50 पेक्षा कमी कर्मचाऱ्यांच्या युनिटमध्ये किमान 2 कर्मचाऱ्यांना रोजगार देणे बंधनकारक असेल. त्यामुळे येत्या दोन वर्षांत सुमारे साडेतीन लाखांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.या योजनेबाबत अधिक माहिती देण्यासाठी 31 जुलै रोजी ईकोटेक-12 येथील इंडस्ट्रियल क्षेत्रात एक विशेष जागरूकता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कर्मचारी भविष्य निधी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक व इच्छुक कर्मचाऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.
Powered By Sangraha 9.0