बुलढाणा,
Gajendra Singh जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथे असलेल्या धारातीर्थ गोमुख धारेखाली भाविकांना श्रावण मासानिमित्त कावड जलस्त्रोत घेऊन जाण्यासाठी आणि भाविकांना अंघोळ करण्यासाठी हे स्थळ खुलं करावं अशी मागणी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडे केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे उल्कापातामुळे सरोवराची निर्मिती झाली आहे हे जगातील तिसरे खार्या पाण्याचं सरोवर म्हणून त्याची ओळख आहे हे सरोवर जिल्ह्याच्या वैभवाच्या आणि धार्मिक अध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे लोणार सरोवर परिसरामध्ये धारातीर्थ गोमुख ही भाविकांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे Gajendra Singh या गोमुखाततुन पडणार्या पाण्याखाली अनेक भाविक श्रावण मासात अंघोळ करत असतात परंतु कोरोनाच्या काळामध्ये लागलेल्या निर्बंधमुळे या गोमुखा खाली अंघोळ करण्यास बंदी घालण्यात आली होती कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर ही या गोमुखाच्या धारेखाली अंघोळ करण्यास मनाई करण्यात आलेली आहे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे गोमुख स्थळ श्रावण मासानिमित्त भाविकांच्या अंघोळीसाठी आणि जलस्त्रोत नेण्यासाठी खुलं करावं अशी मागणी पर्यटन सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडे केंद्रीय