नवी दिल्ली,
dies of helium gas दिल्लीतील बाराखंबा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. २५ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट धीरज कंसल याने स्वतःच्या घरात हेलियम गॅसचा वापर करून आत्महत्या केली. दिल्लीमध्ये हेलियम गॅस भरून आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना असल्याने या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. धीरज गुरुग्राममधील एका कंपनीत काम करत होता आणि अविवाहित होता.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर एक सुसाईड नोट पोस्ट केली होती. या चिठ्ठीत त्याने लिहिले होते, “माझ्यासाठी मृत्यू हा जीवनाचा सर्वात सुंदर भाग आहे. कृपया माझ्या मृत्यूवर दुःखी होऊ नका. आत्महत्या करणे वाईट नाही, कारण मी कोणासाठीही जबाबदार नाही. या पत्रातून धीरजने स्पष्ट केले आहे की त्याच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही.
मंडी हाऊसजवळील बाजार लेनमधील घरात त्याने आपले जीवन संपवले. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. हेलियम गॅस विषारी नसला तरी तो हवेतील ऑक्सिजन कमी करू शकतो. मोठ्या प्रमाणात हेलियमचा श्वास घेतल्यास गुदमरल्यासारखी अवस्था निर्माण होऊ dies of helium gas शकते आणि त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. साधारणपणे फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या वायूमुळे चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यास प्राणघातक धोका निर्माण होऊ शकतो. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुण वयात धीरजने आयुष्य संपवल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.