जाणून घ्या जगातील पाच भीषण त्सुनामी, सर्वात घातक त्सुनामी कोणती?

    दिनांक :30-Jul-2025
Total Views |
मॉस्को,
earthquake रशियामध्ये ८.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने थैमान घातले असून, त्यानंतर त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. या घटनेनंतर जगभरातील लोकांच्या मनात पूर्वी घडलेल्या प्रचंड त्सुनामींच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. मानवी इतिहासात त्सुनामींनी किती भीषण स्वरूप धारण केले आहे, हे काही उदाहरणांतून स्पष्ट होते.
 

tsunami 
 
 
२६ डिसेंबर २००४ रोजी इंडोनेशियाच्या सुमात्रा किनाऱ्याजवळ आलेली त्सुनामी ही जगातील सर्वाधिक घातक आपत्ती मानली जाते. ९.१ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर उठलेल्या समुद्री लाटांनी भारत, श्रीलंका, थायलंड, मालदीव अशा अनेक देशांचा किनारा उद्ध्वस्त केला.earthquake तब्बल २ लाख ३० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतलेल्या या आपत्तीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले.

tsunami 
 
 
इतिहासात २७ ऑगस्ट १८८३ रोजी क्राकाटोआ ज्वालामुखीच्या भीषण उद्रेकामुळे इंडोनेशियामध्ये प्रचंड त्सुनामी आली होती. समुद्रावरून उसळलेल्या या लाटांनी हजारो लोकांचा जीव घेतला. त्याचप्रमाणे २२ मे १९६० रोजी चिली येथे झालेल्या ९.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने निर्माण केलेली त्सुनामी जगातील सर्वात शक्तिशाली ठरली. हवाई, फिलिपाइन्स, जपानपर्यंत पसरलेल्या या आपत्तीने प्रचंड नुकसान घडवून आणले.
२०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या भूकंपानंतर त्सुनामीमुळे फुकुशिमा अणुभट्टी दुर्घटना घडली. या आपत्तीने संपूर्ण जगभर चिंता निर्माण केली होती. त्याआधी १९५८ मध्ये अलास्काच्या लिटुया बे येथे झालेल्या त्सुनामीने जगातील सर्वात उंच लाट – तब्बल १,७२० फूट उंच – निर्माण केली होती.
जगातील या पाच त्सुनामींनी किती विध्वंसक रूप धारण केले याचा अंदाज घेणे कठीण आहे. परंतु मानवी जीवितहानीच्या दृष्टीने २००४ मधील हिंद महासागरातील त्सुनामी ही सर्वात घातक ठरली आहे.earthquake त्यामुळे आज रशियामध्ये झालेल्या भूकंपानंतर पुन्हा त्सुनामीचा धोका निर्माण झाल्याने संपूर्ण जगाची धडधड वाढली आहे.
महाकाय भूकंपाचे दृश्य कॅमेरात कैद