शेगांवच्या पायदलवारीत भक्तांच्या सेवेसाठी लासुरा येथे विशेष वैद्यकीय सेवा व मदत कक्ष

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार

    दिनांक :30-Jul-2025
Total Views |
बुलडाणा,
Prataprao Jadhav संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत खामगाव शेगाव पायी चालणार्‍या लाखो भक्त गणांच्या आरोग्य सुविधेसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून लासुरा फाटा येथे दि. ३१ जुलै रोजी केंद्रिय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पूढाकारातून विशेष वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष उभारण्यात आला आहे.
 

Prataprao Jadhav 
 
पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शनासाठी गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीचा सोहळा आटोपुन पुन्हा शेगांवच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. तब्बल ६१ दिवसाचा पायी प्रवास आटपून ही पालखी ३० जुलै रोजी खामगाव नगरीमध्ये पोहणार असून पालखीचा शेवटचा मुक्काम ही खामगाव येथे होणार आहे आज दि. ३१ जुलैच्या सकाळीच ही पालखी शेगावच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे या पालखी सोबत खामगाव ते Prataprao Jadhav शेगाव असा पायी प्रवास बुलढाणा जिल्ह्यातील लाखो भक्त गण करत असतात १८ किलोमीटरच्या या पायी दिंडी प्रवासामध्ये लहानांपासून तर थोरांपर्यंत श्री चे भक्तगण या शेवटच्या टप्यात पालखी प्रवासात सहभागी होतात आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा समजुन भक्तगणांच्या आरोग्य सुविधेसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून विशेष वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष लासुरा फाटा येथे उभारण्यात आला आहे. या मदत कक्षात दोन रुग्णवाहिका, डॉटर्स, परीचारिका, आरोग्य सेवक यांची पुरशी संख्या आणि औषधी साठा कक्षात ठेवण्यात आला आहे. पायी चालणार्‍या श्रीच्या भक्तगणांना काही त्रास जाणवल्यास वैद्यकीय मदत कक्षाची मदत घ्या असे आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि भुमीपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले.