बसमध्ये महिलेच्या शेजारी बसून त्याने काढला पॅन्ट आणि...

    दिनांक :30-Jul-2025
Total Views |
कोल्लम,
KSRTC bus in Kollam येथे सार्वजनिक वाहतुकीत घडलेल्या एका संतापजनक प्रकारानं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोट्टियमहून कोल्लमला जाणाऱ्या खासगी बसमध्ये एका महिलेला तिच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाकडून अत्यंत लज्जास्पद अनुभव सहन करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये गर्दी असताना एका पुरुष प्रवाशाने महिलेच्या शेजारी बसून अचानक कपडे काढत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. महिलेने धाडस दाखवत तत्काळ या प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि थेट कोल्लम पूर्व पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
 
 

KSRTC bus in Kollam 
 
तक्रारीवर जलद कारवाई करत पोलिसांनी आरोपी सुनील कुमार (वय ४३, मैलक्कड रहिवासी) याला सोमवारी इथिकारा पुलाजवळून अटक केली. KSRTC bus in Kollam या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरोधात लूकआउट नोटीसही जारी केली होती. या घटनेच्या वेळी बसमध्ये इतर तीन महिला प्रवासीही उपस्थित होत्या. त्यांनीदेखील आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिला प्रवाशांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना होण्याची गरज असल्याची भावना समाजातून व्यक्त केली जात आहे.