नर्मदा परीक्रमा केल्याने आयुष्याची दिशा बदलली: चित्रकार श्रीहरी ठोसर

    दिनांक :30-Jul-2025
Total Views |
बुलढाणा,
Narmada Parikrama आयुष्यात कधिही देवाला साधी उदबत्तीही ओवाळली नाही तरी देखील नर्मदा मैय्या नी मला बोलावून ही परिक्रमा पूर्ण करवून घेतली .नर्मदा परीक्रमा केल्यााने प्रत्येक माणसाच्या आयुष्याची दिशा बदलवून सकारात्मक आयुष्य जगण्याचा आनंद मिळतो. असे अनुभव कथन करताना काही प्रसंगाचे वर्णन पसिद्ध चित्रकार श्रीहरी ठोसर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
 
 
buldhana
 
गर्दे वाचनालय व श्रीराम मारोती मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा येथील सुप्रसिध्द चित्रकार श्रीहरी ठोसर यांची नर्मदा परिक्रमा - अनुभव कथन तथा मान्यवरांचा सत्कार समारोह गर्दे सभागृहात दि. २९ जुलै रोजी सायकांळी पार पडला व्यासपीठावर गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष गोकुल शर्मा, विशेष उपस्थिती श्रीराम मारोती मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, पंढरपूर देवस्तचे विश्वस्त ह.भ.प. प्रकाश बुवा जवंजाळ, रेल्वे बोर्ड सदस्य, Narmada Parikrama दिल्ली तथा राष्ट्रीय संयोजक बेटी बचाव बेटी पढाव डॉ. राजेंद्र फडके , कोषाध्यक्ष खंडेलवाल विद्यालय अकोला नाना कुळकर्णी, गर्दे वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबासाहेब वरणगांवकर, सचिव उदय देशपांडे, महाराष्ट्र प्रदेश संयोजक नर्मदा परीक्रमा संघटना राजेश राठोड , सायकलपटू संजय मयुरे व्यासपीठावर उपस्थित होते. सुरवातीला नर्मदा मैय्याच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
 
 
नाना कुळकर्णी यांनी वयाच्या ७० पार केल्यानंतर दोन वेळा गिरनार आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण केली म्हणून त्याची नोंद ग्रिनिज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. Narmada Parikrama आपल्या मनोगतात परिक्रमेचे महत्व विषद करताना माणसाची पापे नर्मदा परिक्रमा तथा नर्मदेत स्नान केल्याने नष्ट होतात तथा गिरीनार पर्वतावर अनेक देवतांचा वास असल्याने विशेषतः दत्त प्रभुंची विश्रांतीची जागा असल्याने प्रत्येकानी एकदा तरी या ठिकाणाला जावे असे आवाहन केले.
 
 
ह.भ.प. जवंजाळ बुवा यांनी आपल्या पत्नीने अगदी तब्येत बरी नसतानाही परिक्रमा पूर्ण केली असल्याचे सांगितलें त्याचीच पुण्याई म्हणून मला आज या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले असल्याचे सांगितले तसेच डॉ. राजेंद्र फडके यांनी मनोगत व्यक्त केले. चित्रकार श्रीहरी ठोसर यांनी परिक्रमे दरम्यानची छायाचित्रे दाखवत नर्मदा परिक्रमा करतांना जे अनुभव आले ते विशद करतांना अंत्यत भाऊक झाले होतो.Narmada Parikrama  याप्रसंगी नाना कुळकर्णी, श्रीहरी ठोसर, संजय मयुरे डॉ. राजेंद्र फडके यांचा गर्दे वाचनालय तथा श्रीराम मारोती मंदिर संस्थान यांच्या कडून यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील नागरिक, महिला, गर्दे वाचनालयाचे संचालक मंडळ, श्रीराम मारोती मंदिर संस्थानचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार डॉक्टर मंडळी उपस्थित होती. कार्येक्रमाचे सूत्र संचालन संजय कुळकर्णी यांनी केले. कार्येक्रमाच्या शेवटी नर्मदा मैय्याची आरती करण्यात आली