Divya Sridhar दक्षिणेतील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्या श्रीधर हिचे वैयक्तिक आयुष्य गेल्या काही महिन्यांत खूप चर्चेत राहिले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये तिने अभिनेता, लेखक आणि प्रेरक वक्ता ख्रिस वेणुगोपालसोबत दुसरे लग्न केले. दोघांचे लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले, विशेषतः ख्रिसचा वयस्कर लूक पाहून अनेकजण चकित झाले होते. ३८ वर्षीय दिव्याने आपल्या आयुष्यातील दुसऱ्या पर्वाची सुरुवात करताच अनेक प्रतिक्रिया उमटल्या, पण या निर्णयामागे तिच्या मुलगी मायाचा संपूर्ण पाठिंबा होता.
लग्नाच्या वेळी माया आईच्या निर्णयामागे ठामपणे उभी राहिली आणि याचमुळे दिव्यासाठी हा कठीण निर्णय थोडा सोपा झाला. ख्रिस केवळ एक पती म्हणूनच नव्हे, तर मायासाठी एक समजूतदार आणि प्रेमळ वडीलसुद्धा ठरला. आता माया आपल्या आयुष्यातील नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे आणि त्याच आनंदात दिव्या व ख्रिस सहभागी झाले आहेत.
दिव्या श्रीधर आणि ख्रिस वेणुगोपाल यांची मुलगी माया हिने व्यवस्थापन आणि विमानचालन या विषयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. तिच्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी दोघांनी तिला कॉलेजमध्ये सोडले आणि त्या खास क्षणाला त्यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. ख्रिस वेणुगोपाल यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत भावनिक कॅप्शन लिहिलं – "मायाच्या भविष्यातील वाटचालीसाठी सर्वांच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे." हा फोटो आणि कॅप्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.या फोटोमध्ये माया कार्यकारी लूकमध्ये, तिची आई दिव्या आणि सावत्र वडील ख्रिससोबत दिसते. लग्नानंतर ख्रिस वेणुगोपाल दिव्याच्या दोन्ही मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढवत आहे. यापूर्वी दिव्या हे दोन्ही जबाबदाऱ्या एकटीने निभावत होती. आता तिच्या आयुष्यात खंबीर साथीदार आणि मुलांना प्रेमळ वडील मिळाल्यामुळे तिचे कुटुंब अधिक मजबूत झाले आहे.