मदतीने शेतकरी आत्महत्या थांबणार नाही : ललित बहाळे

31 Jul 2025 21:15:21
बुलढाणा,
lalit-bahale : जे धोरणाने बदलू शकते ते अर्थसंकल्पीय मदतीने बदलू शकत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय मदतीने शेतकरी आत्महत्या थांबणार नाही असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे (शरद जोशी प्रणित) प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी केले. दि. ३१ जुलै रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने स्थानिक पत्रकार भवन बुलढाणा येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.
 
 
 
KL
 
 
 
ललित बहाळे यांनी सांगितले अद्यावत तंत्रज्ञानामुळे शेतकरी आत्महत्या रोखल्या जावू शकतात. त्यामुळे शेतीत्साठी अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले पाहिजे, जेनेटिक इंजिनीअरिंग च्या वा-परावर सरकारने बंदी घातली आहे. पण जेनेटिक इंजिनीअरिंगचा वापर सरकारने करू दिल्यास शेतकरी आत्महत्या कमी होतील. त्याच बरोबर सरकारी धारेणाने जे बदलते शेतकर्‍यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती द्या कारण माफी हे गुन्हेगाराला दिली जाते. त्यामुळे कर्जमुक्ती द्या. शासनाच्या चुकीच्या धारेणांमुळे शेतकर्‍यांवर कर्ज होत आहे. जर योग्य धोरण ठरवली तर शेती व्यवसायतून शेतकरी आपले कर्ज भरू शकतो. पण सरकार कुठल्याही पक्षाचे असो ते धोरण बदलत नाही. नेहमी शेतकरी विरोधी धोरण सरकार राबवित असते. सोयाबीन बाजारात आल्यानंतर सेबीच्या कार्यालयावर शेतकरी संघटनेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात मोर्चा काढण्यात येणार आहे.
 
 
स्वामीनाथन आयोगाच्या शिफराशी मान्य नाहीत. शेती व्यवसाय आहे त्याला व्यवसायाची प्रतिष्ठता प्राप्त झाली पाहिजे. शेतकनी आत्महत्या या अर्थसंकल्पात काही तरतूद केल्यामुळे कमी होवू शकत नाही. तर धोरणांमध्ये बदल केल्यावरच शेती टिकू शकते. दर पाच वर्षांनी यापुढे कर्जमाफी होत राहिल. असे मत बहाळे यांनी व्यक्त केले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील कणखर, ललित ढोसे, एकनाथ पाटील, ज्ञानेश्वर खरात यांच्यासह इतरांची यावेळी उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0