आयात शुल्काचा फटका रत्न व दागिन्यांच्या उद्योगाला

-नवे आयात उद्यापासून लागू होणार -ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने व्यक्त केली चिंता

    दिनांक :31-Jul-2025
Total Views |
नागपूर,
nagpur-news : भारतातून होणार्‍या आयातीवर लादलेले शुल्क १० टक्क्यांवरून थेट २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. हे नवे शुल्क १ ऑगस्टपासून लागू होणार असल्याने त्याचा फटका रत्न व दागिन्यांच्या उद्योगाला बसणार असल्याची शक्यता ऑल जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केली आहे.
 
jewallery
 
दागिन्यांची निर्यात जगभर
 
 
भारतावर २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय पूर्णत: खेदजनक असून भारतापेक्षा अमेरिकेवरच याचे परिणाम आगामी काळात दिसून येणार आहे. वाढीव शुल्कामुळे भारताच्या तुलनेत अमेरिकेलाच अधिक तोटा होणार आहे. यात प्रामुख्याने दागिन्यांची निर्यात भारतातून जगभर यापूर्वी १० टक्के आयात शुल्क असताना जेम अँड ज्वेलरी उद्योगात सुमारे ५० हजार लोक बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता शुल्क २५ टक्के झाल्यास ही बेरोजगारी १ लाखांच्या पुढे जाऊ शकते.
 
 
गेल्या काही वर्षांत भारताने युरोपियन युनियन व मध्यपूर्व देशांमध्ये व्यापाराचे पर्यायी मार्ग शोधून ठेवल्यामुळे भारतातील निर्यात नाही, अशी आशा राजेश रोकडे यांनी व्यक्त केली आहे.