आ. डॉ. मिलिंद नरोटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

31 Jul 2025 17:25:44
गडचिरोली, 
dr-milind-narote गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा वाढदिवस गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले.
 
 
 
narote
 
या निमित्ताने आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके तसेच भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी डॉ. नरोटे यांना केक भरवुन पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त निरोगी, यशस्वी व दीर्घायुषी जीवनासाठी त्यांना आशीर्वाद दिले.dr-milind-narote यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेडी, पोलिस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते, अधिकारी व हितचिंतक उपस्थित राहनू आमदार डॉ. नरोटे यांना शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0