जप्त केलेली दारू केली नष्ट

31 Jul 2025 20:05:39
तभा वृत्तसेवा पुसद,
liquor was destroyed शहर पोलिस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी अवैधरित्या व विनापरवाना दारूवर केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या दारूवर रोड रोलर फिरवून ती नष्ट केली. ही कारवाई अतिरिक्त पोलिस अधीक्षक हर्षवर्धन यांच्या नेतृत्वात ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाèयांच्या उपस्थितीत न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आली.
 

liquor was destroyed 
गुरुवार, 31 जुलै रोजी विठाळा वार्डजवळ असलेल्या हेलिपॅडजवळ करण्यात आली. शहर पोलिस ठाण्यातील विविध 25 गुन्ह्यांतील 2022 ते 2024 पर्यंत अवैधरित्या व विनापरवाना विक्रीकरिता बाळगून ठेवलेल्या दारूवर टाकलेल्या धाडीतील हा मुद्देमाल होता.
या 6 लाख 25 हजार रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्यांवर रोड रोलर फिरवून त्या नष्ट केल्या गेल्या. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाèयांसमक्ष करण्यात आल्याची माहिती ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी दिली. या कारवाईमुळे अवैधरित्या दारू विकणाèयाचे धाबे दणाणले आहे.
Powered By Sangraha 9.0