प्रेयसी अथवा वेश्येसोबत संबंध ठेवण्याचा विकृत सल्ला! भोंदूबाबाचा अजब कारनामा

धक्कादायक प्रकार उघड

    दिनांक :04-Jul-2025
Total Views |
पुणे,
Bhimrao Tamdar पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसरात 'दिव्य शक्ती' असल्याचा दावा करणाऱ्या एका भोंदूबाबाचा अत्यंत धक्कादायक आणि विकृत गुन्हा उघडकीस आला आहे. प्रसाद ऊर्फ दादा भीमराव तामदार (वय २९) असे या भोंदूचे नाव असून, तो स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून सादर करत अनेकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. मृत्यू टाळण्यासाठी प्रेयसी किंवा वेश्येसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देत तो भक्तांचे लैंगिक आणि मानसिक शोषण करीत होता.
 
 

Bhimrao Tamdar 
 
 
 
हिडन ॲप्सचा वापर करून भक्तांच्या खासगी क्षणांवर नजर
या भोंदूबाबाने भक्तांच्या मोबाईलमध्ये गुप्त हिडन ॲप्स डाऊनलोड करून त्याचा पूर्ण कंट्रोल मिळवला होता. यामार्फत तो त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवत होता. मोबाईल एक विशिष्ट कोनात ठेवायला लावून तो शारीरिक संबंधाचे थेट दृश्य पाहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पीडिताच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या एका हिडन अॅपमुळे संपूर्ण प्रकाराचा भांडाफोड झाला.
 
 
‘तुझा मृत्यू अटळ आहे’, म्हणत दिला विकृत सल्ला
“तुझा मृत्यू Bhimrao Tamdar अटळ आहे. जर वाचायचं असेल, तर एखाद्या प्रेयसी अथवा वेश्येसोबत शारीरिक संबंध ठेव” असा अघोरी सल्ला देत या बाबाने भक्तांना अश्लील कृतीस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे तो त्यांच्यावर मानसिक दबाव टाकत होता.फिर्यादी ३९ वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासात या भोंदू बाबाने केवळ लैंगिक नव्हे, तर आर्थिक फसवणूकही केल्याचे उघड झाले. त्याच्या आश्रमातून पोलिसांनी ३ मोबाईल, २ आयपॅड, विविध औषधे, सिमकार्ड्स, पेनड्राईव्ह आणि अश्लील व्हिडिओ क्लिप्स असण्याची शक्यता असलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत.
 
 

सायबर तज्ज्ञांची मदत; इतर पीडितांची माहिती मिळण्याची शक्यता
त्याच्या ताब्यातील एक जुना फोन आणि दोन स्मार्टफोन पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. डिलीट केलेली माहिती पुनर्प्राप्त करण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. या प्रकरणात इतरही अनेक पीडित भक्त बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलीस तपास अधिक खोलवर सुरू आहे.