नागपूर,
Katol orange processing plant काटाेल औद्याेगिक वसाहतीमधील बंद पडलेला संत्रा प्रक्रिया कारखाना 40 हजार चाैरस मीटर आकाराच्या भूखंडासह महाराष्ट्र कृषी उद्याेग विकास महामंडळाला हस्तांतरित करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अधिकृत अवसायकांना दिला आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवसायकांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
या प्रकरणावर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. हा कारखाना मे. अलायन्स अॅग्राे इंडिया कंपनीद्वारे संचालित केला जात हाेता. काटाेल व नरखेड तालुक्यासह विदर्भातील सर्व संत्रा उत्पादकांना या कारखान्याचा फायदा हाेणे अपेक्षित हाेते; परंतु कंपनी आर्थिक व इतर विविध अडचणींमुळे हा कारखाना सक्षमपणे चालवू शकली नाही. दरम्यान, कारखाना बंद पडला व कर्ज थकल्यामुळे कंपनीला दिवाळखाेर घाेषित करण्यात आले. परिणामी, 26 सप्टेंबर 2014 राेजी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र कृषी उद्याेग विकास महामंडळाची मागणी मंजूर करून अलायन्स अॅग्राे इंडिया कंपनी बंद केली व पुढील कारवाईसाठी कंपनीवर अधिकृत अवसायकाची नियुक्ती केली. त्यानंतर उद्याेग महामंडळाने संबंधित करारानुसार जमिनीसह संपूर्ण कारखान्याचा ताबा मिळिवण्यासाठी 2018 मध्ये उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला हाेता. ताे अर्ज मंगळवारी (दि. 1) मंजूर करण्यात आला. महामंडळाच्या वतीने अॅड. महेश शुक्ला यांनी कामकाज पाहिले.
नवीन उभारी देण्याची आवश्यकता
काटाेल व Katol orange processing plant नरखेड तालुक्यासह संपूर्ण विदर्भात विविध ठिकाणी संत्रा पीक घेतले जाते; परंतु संत्रा उत्पादकांना याेग्य भाव मिळत नाही. त्यामुळे संत्रा उत्पादकांचा अद्यापही हवा तेवढा विकास झाला नाही. त्यामुळे सरकारने काटाेलच्या संत्रा प्रक्रिया कारखान्याला नवीन उभारी द्यावी आणि त्याकरिता स्थानिक नेत्यांनी प्रयत्न करावेत, अशी संत्रा उत्पादकांची भावना आहे.
1997 मध्ये सुरू झाला कारखाना
काटाेलचा Katol orange processing plant संत्रा प्रक्रिया कारखाना 1997 मध्ये सुरू झाला हाेता. फे ब्रुवारी 1997ते मे 2001 पर्यंत प्रकल्प सुरू हाेता. त्यावेळी 11.47 काेटी रुपये खर्च या प्रकल्पावर झाला हाेता. शासन आणि महाराष्ट्र कृषी उद्याेग विकास महामंडळाने संयुक्तपणे हा प्रकल्प सुरू केला हाेता. कालांतराने महामंडळाने मे. अलायन्स अॅग्राे इंडिया कंपनीशी करार करून त्यांना हा कारखाना चालविण्यासाठी दिला हाेता. 2001 मध्ये हा कारखाना बंद पडला.