'सितारे जमीन पर'ने रचला इतिहास!

04 Jul 2025 15:49:18
मुंबई
Sitare Zameen Par आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना भावनिक केवळ केलेच नाही, तर समाजात सर्वसमावेशकतेबाबत एक नवा आदर्शही निर्माण केला आहे. केवळ कमाईसाठी नव्हे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने शाहरुख खान, सलमान खान यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या अनेक चित्रपटांना एका बाबतीत मागे टाकले आहे.
 
 

Sitare Zameen Par accessibility features 
पहिला 'सर्वसमावेशक' चित्रपट
‘सितारे जमीन Sitare Zameen Par पर’ ही भारतातील पहिली अशी चित्रपट ठरली आहे, ज्यामध्ये सर्व महत्त्वाच्या सुलभता (accessibility) सुविधा एकत्र समाविष्ट करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, हा चित्रपट पाहण्यास आणि समजण्यास प्रत्येकजण सक्षम ठरतो — मग तो व्यक्ती अंध, बहिरे किंवा बोलण्यात अक्षम असो.या चित्रपटात क्लोज्ड कॅप्शनिंग, ऑडिओ डिस्क्रिप्शन आणि भारतीय सांकेतिक भाषा (ISL) यांचा समावेश आहे. त्यामुळे ऐकू न येणाऱ्या, दिसत नसलेल्या किंवा बोलू न शकणाऱ्या प्रेक्षकांनाही ही कलाकृती सन्मानाने आणि स्वतंत्रपणे अनुभवता येते.
 
 
२० जूनला झाला ऐतिहासिक टप्पा पार
२० जून २०२५ रोजी Sitare Zameen Par  प्रदर्शित झालेला हा चित्रपट केवळ भारतीय सिनेसृष्टीतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. जागतिक स्तरावरील अनेक चित्रपटांमध्ये काही काही सुलभता सुविधा असतात, मात्र ‘सितारे जमीन पर’ने पहिल्यांदाच थिएटर रिलीजसाठी सर्व सुविधा एकत्रित करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.भारतीय सांकेतिक भाषेचा (Indian Sign Language) समावेश XL सिनेमा अ‍ॅपच्या मदतीने शक्य झाला. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रेक्षक त्यांच्या मोबाईल डिव्हाइसवर थेट ISL दुभाष्याशी कनेक्ट होऊ शकतात. सिनेमातील संवाद आणि ऑडिओला सिग्नल करून, अ‍ॅप ऐकू न येणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक सुगम आणि समृद्ध अनुभव तयार करतो.क्लोज्ड कॅप्शनिंग: संवाद आणि ध्वनी वर्णन ऑन-स्क्रीन दिसते, जे ऐकू न येणाऱ्यांना मदत करते.ऑडिओ डिस्क्रिप्शन: चित्रपटातील भाव, हालचाल, दृश्यांचे वर्णन एका आवाजात केले जाते, ज्यामुळे दृष्टिहीन प्रेक्षकही कथेशी जोडले जातात.ISL (Indian Sign Language): भारतीय सांकेतिक भाषा आता थेट थिएटरमध्ये अनुभवता येते, जे मूकबधिरांसाठी क्रांतिकारक ठरत आहे.
 
 

आमिर खान प्रोडक्शन्सचा पुढाकार
 
आमिर खान Sitare Zameen Par प्रोडक्शन्सने विकलांगता क्षेत्रातील कार्यकर्ते आणि XL सिनेमाच्या तज्ज्ञांशी मिळून हा समावेशक उपक्रम साकारला. मनोरंजनाच्या क्षेत्रात सर्वसमावेशकतेच्या दिशेने हे एक मोठं आणि धाडसी पाऊल असल्याचं मत सर्वच स्तरांतून व्यक्त केलं जात आहे.या अभिनव प्रयोगामुळे, ‘सितारे जमीन पर’ने केवळ एक संवेदनशील चित्रपट देण्यात यश मिळवलं नसून, संपूर्ण चित्रपटसृष्टीसमोर नवीन मापदंड देखील ठेवले आहेत.
Powered By Sangraha 9.0