वर्धेत १९४ इमारती धोकादायक

05 Jul 2025 22:00:26
वर्धा,
buildings in Wardha are dangerous वर्धा नगरपालिकेकडून पावसाळ्यात होणारे नुकसान लक्षात घेता प्रभागनिहाय सर्वेक्षण करून जीर्ण इमारतींची माहिती संकलित करण्यात आली. नगरपालिकेच्या नगर रचनाकार्य विभागाकडे १९४ इमारती धोकादायक असल्याची नोंद आहे. जीर्ण १४९ मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यात ४५ कुटुंबांचे नाल्यालगत वास्तव्य आहे.
 
 
buildings in Wardha are dangerous
 
दरवर्षी मान्सूनपूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. नगरपालिकेकडून सातत्याने नोटीस देण्यात येत असूनही अनेक इमारतींची दुरवस्था अधिकाधिक होत आहे. काही इमारती अक्षरशः खंडर झाल्या असून काही ठिकाणी नागरिक जीव धोयात घालून राहत आहेत. buildings in Wardha are dangerous गत काही वर्षात बाजार परिसरात जीर्ण इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील विविध प्रभागांमध्ये दररोज फिरणार्‍या कर व स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांवरच या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक वर्षी सर्वेक्षण होते. नोटीस बजावले जातात. परंतु, इमारत मालक याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे.
 
 
लहानूजीनगर, महादेवपुरा, पटेल चौक, राजकला टॉकीज, रामनगर, एसटी डेपो रोड, केळकरवाडी, गोंडप्लॉट, शिवनगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जीर्ण इमारती आहेत. buildings in Wardha are dangerous विशेषतः लहानुजीनगरमधील म्हाडाची जुनी फ्लॅट स्कीम पूर्णतः जीर्ण झाली आहे. शहरातील अनेक जीर्ण इमारतींविषयी घरघुती वाद सुरू आहेत. न्यायप्रविष्ठ प्रकरणांमुळे नगरपालिका प्रशासन संबंतिध इमारती पाडू शकत नाही.
Powered By Sangraha 9.0