वर्धा,
ganja from Odisha in wardhe स्थानिक गुन्हे शाखेची चमू वर्धा शहर परिसरात अवैध व्यवसायावर कारवाईसाठी गस्तीवर होते. गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा-सावंगी (मेघे) रस्त्यालगत असलेल्या दयासागर अंडा स्टॉल दुकानाजवळ सापळा रचून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी चौघांना अटक करून गांजासह ५ लाख ३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सूरज चव्हाण (२७) रा. बंगाली कॅम्प हनुमान मंदिराचे मागे इंदिरानगर रोड चंद्रपूर, विजय दुधकवरे (३३) रा. इंदिरानगर आर्वी नाका या दोघांनी यश बेमाल (२८) रा. सावंगी (मेघे) रा. राजूनगर देवळी रोड वर्धा व अमिर नाशिर खॉ पठान रा. इंदिरानगर आर्वी नाका यांच्या सांगण्यावरून रेल्वेने ओडिसा येथे गेले. तेथुन त्यांनी मदन नामक इसमाकडून गांजा खरेदी केला होता. गांजा दोन सुटकेसमध्ये भरून वर्धा रेल्वे स्टेशन येथे परत आले. गांजा घेण्याकरिता यश बेमाल व अमीर पठाण हे घटनास्थळी त्यांचे कारने आले होते. अमीर पठाण याला पोलिसांची चाहूल लागताच तो कारने पळून गेला. तर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० किलो गांजा किमत ४ लाख २ हजार २२० रुपये, ३ मोबाईल, दोन सुटकेस असा ५ लाख ३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, बालाजी लालपालवाले, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवी पुरोहित, अक्षय राऊत, विनोद कापसे, अभिषेक नाईक, अनिल साटोणे, अजित धांदरे व मंगेश धामंदे यांनी केली आहे.