शासकीय आश्रमशाळेत व्यायाम शाळा व कुस्तीची मॅट द्या

मुख्यमंत्री फडणवीसांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तडस यांचे पत्र

    दिनांक :05-Jul-2025
Total Views |
वर्धा,
Government Ashram School महाराष्ट्रातील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामध्ये खेळाडूंना प्रशिक्षण देणे, स्पर्धा आयोजित करणे आणि कुस्तीला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती करणे, शालेय स्तरावर कुस्तीचे वर्ग सुरू करणे, आश्रमशाळा तसेच शाळांमध्ये कुस्तीचे वर्ग सुरू करून लहानपणापासूनच मुलांना या खेळाची ओळख करून देणे आवश्यक असल्याने शासकीय आश्रमशाळांमध्ये व्यायाम शाळा व कुस्तीची मॅट उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी केली आहे.
 

Government Ashram School 
 
मल्लविद्येचे माहेरघर म्हणून मानल्या जाणार्‍या भारतात अजूनही कुस्ती मोठ्या प्रमाणात खेळल्या जाते. कुस्ती हा भारताचा पारंपरिक खेळ आहे आणि मनोरंजनाचे जुने साधन आहे. पुर्वी कुस्ती हा खेळ फत पुरुषांसाठी होता. आता महिलाही सक्रीयपणे सहभागी होत आहेत.  देशात हरयानानंतर महाराष्ट्रातील पुरुष व महिला पहेलवानांनी राज्य, राष्ट्रीय, राष्टकुल व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे व देशासाठी अनेक पदके प्राप्त केली आहे. यामध्ये अनेक आदिवासी मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पहेलवान गरीब परिस्थीतीतून आलेले असुन महाराष्ट्रातला पहेलवान कुठेही कमी नाही. राज्य, राष्ट्रीय, राष्टकुल, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
 
  
देशासाठी अनेक पदकं प्राप्त केली आहेत. महाराष्ट्रातील पहेलवानाना लहानपणापासूच कुस्तीसाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात राज्य, राष्ट्रीय, राष्टकुल व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पहेलवान घडविण्यासाठी महत्त्वपुर्ण निर्णय घेणे आवश्यक आहे. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे तयार केल्यास कुस्तीला निश्चितच प्रोत्साहन मिळेल आणि हा खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. राज्यात मोठ्या प्रमाणात आश्रमशाळा आहे, तिथे सोईसुविधा उपलब्ध असुन राज्यातील शासकीय आश्रमशाळेमध्ये व्यायाम शाळा व कुस्तीची मॅट उपलब्ध करुन दिल्यास निश्चितच त्याचा फायदा कुस्तिगीर घडविण्यासाठी होईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात माजी खासदार तडस यांनी नमुद केले आहे.