शासकीय धान खरेदीचा मार्ग मोकळा करा

05 Jul 2025 17:29:23
गोंदिया, 
government paddy शासकीय धान खरेदीचे मुदतीपूर्वीच उद्दिष्ट पुर्ण झाल्याने हजारो शेतकरी धान विक्रीला मुकले आहेत. धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून धान खरेदीचा मार्ग 7 जुलैपर्यंत मोकळा न केल्यास 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा गोंदिया जिल्हा शासकीय आधारभुत धान खरेदी संस्थाचा संघाने जिल्हाधिकारी, जिल्हा पणन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. पुर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्हयांमध्ये खरीप व उन्हाळी हंगामात धानाचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात अतिवृष्टी, कीडींचा प्रादुर्भाव, अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली.
 
 
 
peddy
 
 
परिणामी शासकीय आधारभूत किमत योजने अंतर्गत जिल्हयाला मिळालेले 40 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण झाले नाही. उन्हाळी हंगामात जिल्हयात 67 हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली होती. जिल्हा पणन कार्यालयाला 11 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. हे उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण झाले. धान विक्रीसाठी पणन कार्यालयाकडे 60 हजार 278 शेतकर्‍यांनी नोंदणी केली. पैकी 25 हजार 9 शेतकर्‍यांनी 11 लाख 2 हजार क्विंटल धान विक्री केली. अद्यापही 35 हजार 269 शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत. खुल्या बाजारात हमीदरापेक्षा 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल कमी दर असल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी विवंचनेत सापडलेला आहे.government paddy सोमवार 7 जुलैपर्यंत धान खरेदीचा मार्ग मोकळा न केल्यास मंगळवार 8 जुलै रोजी दुपारी 12 वाजता शहरातील जयस्तंभ चौक येथून धान उत्पादकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धाडक देण्यात येणार आहे. यासंबंधिचे निवेदन 4 जुलै रोजी गोंदिया जिल्हा शासकीय आधारभुत धान खरेदी संस्थाचा संघाचे अध्यक्ष प्रविण (बिट्टू) बिसेन यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी संघाचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0