झाशी स्टेशनवर फिल्मी दृश्य! आर्मी डॉक्टरने केले सुरक्षित बाळंतपण

फुटओव्हर ब्रिजवर बनला प्रसूती कक्ष

    दिनांक :06-Jul-2025
Total Views |
उत्तर प्रदेश,
Jhansi railway station उत्तर प्रदेशातील झाशी रेल्वे स्टेशनवर मंगळवारी एक भावूक करणारी आणि दुर्मिळ घटना घडली. गर्भवती महिलेला अचानक प्रसववेदना सुरू झाल्यानंतर तिने थेट प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 जोडणाऱ्या फुटओव्हर ब्रिजवरच बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे, त्या वेळी भारतीय सेनेतील मेजर डॉक्टर रोहित हे स्टेशनवर उपस्थित होते. त्यांनी कोणतीही वैद्यकीय किट नसताना धाडसाने आणि तातडीने महिलेचा सुरक्षित प्रसव करून एक नव्या जीवाला जन्म दिला.
 

Jhansi railway station Foot over bridge delivery 
वैद्यकीय किटशिवाय केले यशस्वी प्रसव
डॉक्टर रोहित हे झाशीच्या मिलिटरी हॉस्पिटलशी संलग्न आहेत आणि त्या दिवशी ट्रेनची वाट पाहत होते. त्याच वेळी फुटओव्हर ब्रिजवर महिला वेदनेने विव्हळत होती. आजूबाजूचे लोक गोंधळले होते, मात्र डॉक्टर रोहित यांनी प्रसंगावधान राखत लगेच पुढाकार घेतला.डॉक्टर रोहित यांच्याकडे कोणतेही औषध, कात्री किंवा उपकरण नव्हते. तरीही त्यांनी अतिशय सूजलेल्या डोळ्यांनी आणि शांत डोक्याने हे संकट हाताळले. त्यांनी महिलेला योग्य प्रकारे बसवले, एका केसांच्या क्लिपने नाळ क्लॅम्प केली आणि पॉकेट नाइफने ती कापली. स्वच्छतेची काळजी घेत सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या या धाडसामुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहिले.
 
 
 
 
रेल्वे आणि सैन्य यांचे उत्तम समन्वय
घटनेची माहिती Jhansi railway station  मिळताच रेल्वे कंट्रोल रूमने त्वरित वैद्यकीय पथक पाठवले. महिला व नवजात बाळाला लगेच रूग्णालयात हलवण्यात आले. उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागाने यासंदर्भात अधिकृत निवेदन देत मेजर डॉक्टर रोहित आणि रेल्वेच्या वैद्यकीय पथकाच्या तात्काळ प्रतिसादाचे कौतुक केले आहे.ही घटना समोर येताच सोशल मीडियावर लोकांनी मेजर रोहित यांचे भरभरून कौतुक केले. "सेनिक कधीही ड्युटीवर असतो, मग तो बॉर्डरवर असो वा रेल्वे स्टेशनवर," अशा प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यांना "रिअल हिरो" आणि "फरिश्ता" म्हणून गौरवले आहे.
मेजर रोहित यांची ही कृती एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे, जी दीर्घकाळ लोकांच्या मनात राहील. ही घटना भारतीय सेनेच्या सेवाभावाचे आणि तत्परतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे.