पंजाब,
Aniljit Kamboj shot प्रसिद्ध पंजाबी चित्रपट अभिनेत्री तानिया कम्बोज यांचे वडील आणि हरबंस नर्सिंग होमचे संचालक डॉ. अनिलजीत कम्बोज यांच्यावर शुक्रवारी भरदिवसा भर चौकात गोळीबार करण्यात आला. हा थरारक प्रकार मोगा जिल्ह्यातील कोट ईसे खां या छोट्या कसब्यात घडला. सध्या डॉ. कम्बोज यांच्यावर मोगा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ते वेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेचा Aniljit Kamboj shot धक्कादायक व्हिडिओ नर्सिंग होममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पगडीधारी दोन तरुण क्लिनिकमध्ये दिसून येतात. त्यापैकी एक युवक रुग्ण बनून डॉ. कम्बोज यांच्याकडे आपल्या पायातील खाजबद्दल तक्रार करतो. डॉक्टर त्याचा पाय तपासत असताना, दुसरा युवक अचानक पिस्तूल काढून डॉ. कम्बोज यांच्यावर जवळून गोळी झाडतो. ही गोळी थेट त्यांच्या छातीत घुसते.घटनेच्या वेळी डॉक्टरांच्या शेजारी त्यांच्या क्लिनिकमध्ये त्यांचा मुलगा चाहत कम्बोज उपस्थित होता, जो मोबाईलमध्ये व्यस्त होता. गोळीबार होताच चाहत तातडीने आपल्या वडिलांकडे धावतो. दरम्यान, गोळी झाडणारा युवक आणि त्याचा साथीदार तिथून पळून जातात. निघताना ते अजून एक गोळी झाडतात. सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दोघांच्याही हातात शस्त्र दिसून येतात.
गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेतील डॉ. कम्बोज यांना तातडीने मोगा येथील मॅडीसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर सध्या वेंटिलेटरवर उपचार सुरू असून त्यांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पूर्ववैमनस्य, खंडणी किंवा इतर कुठल्या वैयक्तिक कारणातून हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करत तपास अधिक गतीने सुरू केला आहे.