शेतकर्‍यांना काढावी लागते चिखलातून वाट !

पांदण रस्त्याची दुर्दशा

    दिनांक :07-Jul-2025
Total Views |
मानोरा,
Pandan road शासनाने शेतकर्‍यांना शेतातील मालाची तसेच बी-बियाणे, खते ने-आण करण्यासाठी येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन पांदण रस्त्यांचे खडीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन तहसीलदारांनी पांदण रस्त्यांना महत्त्व देत तालुक्यातील पांदन रस्ते मोकळे केले. मानोरा तालुयात फुलउमरी ते वाघमाय या दोन किलोमीटर रस्त्याचे काम प्रशासनाने प्रलंबित ठेवल्याने सद्यस्थितीला या पांदण रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. यामुळे शेतकर्‍यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्यावरून ये जा करणे जिकरीचे झाले असून, पावसाळ्यात शेतात रासायनिक खते, बियाणे डोयावर घेऊन जावे लागते.
 
 

पांदण रोड  
 
 
दिवसेंनदिवस कमी होणार्‍या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. शेतमाल बाजारात पोहोचविण्यासाठी तसेच, यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे. असे शेतरस्ते योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्त्रोतांमधून निधीच्या उपलब्धते बाबत अडचणी निर्माण होत होत्या. यावर मात करून शेतकर्‍यांना शेतात वाहतुकी योग्य रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून पांदन रस्ते योजना राबविण्याचा महत्त्वाकांक्षी शेतकर्‍यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पांदण रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक असणार्‍या साधनांची ने-आण करण्यासाठी उपयोगात येतात.
शासनाने पांदण रस्त्याच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर मानोरा तालुयात अनेक गावातील पांदण रस्ते मोकळे करण्यात आले व खडीकरण देखील करण्यात आले. मात्र फुलउमरी ते वाघमाय या पांदण रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने शेतकर्‍यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.Pandan road तहसीलदार यांनी लक्ष देऊन यावर आवश्यक ती कारवाई करावी, असे फुलउमरी येथील शेतकरी हरिचंद राठोड, प्रेम राठोड, संजय राठोड यांनी म्हटले आहे.