VIDEO हृदयदावक! … ११ महिन्यांची निकिता राहिली एकटीच

विनाशकारी पुराने हिरावले संपूर्ण कुटुंब

    दिनांक :07-Jul-2025
Total Views |
हिमाचल प्रदेश
Himachal Pradesh flood हिमाचल प्रदेशात काही दिवसांपूर्वी आलेल्या प्रलयंकारी पुरामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. या आपत्तीमुळे अनेक कुटुंबांचे संसार मोडून गेले, अनेकांनी आप्तस्वकीय गमावले. या भयानक घटनांदरम्यान एक वेदनादायक आणि अंत:करण हेलावणारा प्रसंग समोर आला आहे. ११ महिन्यांची चिमुरडी निकिता या महापुरातून एकटीच वाचली आहे. दुर्दैव असे की, या आपत्तीत तिने तिचे आई-वडील आणि आजीला कायमचे गमावले. अवघ्या काही क्षणांत निकिता अनाथ झाली.
 
 
 
Himachal Pradesh flood
पूराच्या तडाख्याने निकिताचे संपूर्ण कुटुंब वाहून गेले. मात्र नियतीच्या क्रुर खेळात तिचा जीव somehow वाचला. सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, हजारो लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तिच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करत तिच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
 
 
या कठीण Himachal Pradesh flood प्रसंगी प्रशासन पुढे सरसावलं असून निकिताच्या संपूर्ण जबाबदारीचा भार घेतला आहे. हिमाचलच्या एसडीएम स्मृतिका नेगी या स्वतः या चिमुरडीची काळजी घेत आहेत. त्यांनी निकिताला आईसारखे प्रेम देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निकिता सध्या तिला मिळालेल्या प्रेमात थोडी सावरत आहे.यासोबतच तिची आत्या तारा देवी देखील सध्या तिच्यासोबत आहे आणि तिच्या देखरेखीची जबाबदारी स्वीकारली आहे. तारा देवी या आपत्तीमुळे आपल्या बहिणी, मेहुण्याचा आणि आईचा मृत्यू पाहून कोसळल्या आहेत. मात्र, त्यांनी निकितासाठी आपला शोक बाजूला ठेवून तिच्या भविष्यासाठी निर्धाराने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. “निकिताला कधीही एकटं पडू देणार नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.
 
 
 
प्रशासनाकडूनही Himachal Pradesh flood निकिताला पूर्ण मदत केली जात आहे. तिच्या शिक्षणाची, उपचारांची, जेवणाची आणि निवासाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे की, निकिताला एक चांगलं भविष्य घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.ही घटना हिमाचल प्रदेशातील आपत्तीमधील अनेक दुःखद घटनांपैकी एक आहे, जी माणुसकीचे खरे रूप दाखवणारी देखील आहे. छोट्या निकिताच्या आयुष्यात आलेला अंधार, प्रशासन आणि नात्यांनी पुन्हा प्रकाशमान करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजाने आणि सरकारने एकत्र येत या चिमुकलीसाठी उभं राहणं, हीच खरी मदत ठरेल.