सहकार विद्या मंदिरची माजी विद्यार्थीनी ठरली मिसेस इंडिया वन इन अ मिलियन

    दिनांक :08-Jul-2025
Total Views |
बुलढाणा,
Sahakar Vidya Mandir स्थानिक बुलढाणा अर्बन द्वारा संचालित सहकार विद्या मंदिर, बुलढाणाची माजी विद्यार्थीनी अपूर्वा समदूरकर कुलकर्णी दिल्ली येथे आयोजित मिसेस इंडिया वन इन अ मिलियन या सौंदर्य स्पर्धेत विजेती ठरली. दिल्ली येथील लीला अ‍ॅम्बीयनची कन्व्हेंशन हॉल मध्ये दि. २६ जून ते २९ जून पार पडलेल्या मिसेस इंडिया वन इन अ मिलियन या सौंदर्य स्पर्धेत भारतातील सर्व राज्यांच्या स्पर्धक महिलांनी सहभाग घेतला होता.
 
 
Buldhana
 
गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करत अपूर्वा समदूरकर कुलकर्णी यांनी स्पर्धेच्या मुख्य विजेतेपदासह १) मिसेस इंडिया वन इन अ मिलियन पॉप्युलर प्लॅटीनम २०२५ २) बेस्ट वॉक प्लॅटीनम २०२५ ३) बॉडी ब्युटीफूल प्लॅटीनम २०२५ ४) फायनलिस्ट २०२५ या सबकॉन्टेस्ट मध्येही त्या विजेत्या ठरल्या. त्यांनी स्थानिक सहकार विद्या मंदिर मधून इयत्ता १ ली ते १२ वी आणि लद्दड अभियांत्रिकी कॉलेज मधून बी.ई. कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवी तर नागपूर येथून एम.टेक चे शिक्षण पूर्ण केले आहे. अगदी शालेय, वयापासून मिस इंडिया’ बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अपूर्वा यांनी आय.टी. क्षेत्रात कार्यरत असतांनाही मिसेस इंडिया वन इन अ मिलियन ठरल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. बुलढाणा अर्बन परिवाराचे राधेश्याम चांडक, डॉ. सुकेश झंवर, सहकार विद्या मंदिरच्या अध्यक्षा कोमल झंवर, विद्यालयाचे प्राचार्य सामी तसेच सर्व शिक्षकवृंद आणि बुलढाणा शहरवासियांच्यावतीने त्यांच्या या नामांकित यशाबद्दल त्यांचे कौतूक केले जात आहे.