६६ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण घोषित

    दिनांक :08-Jul-2025
Total Views |
बुलढाणा,
Buldhana News तालुयातील ६६ ग्रामपंचायतीचे सरपंच व महिला सरपंच आरक्षण उपविभागीय अधिकारी तथा निरीक्षक शरद पाटील यांचे अध्यक्षतेखाली तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी विठ्ठल कुंबरे यांचे उपस्थितीत दि. ८ जुलै रोजी दुपारी बुलढाणा तालुयातील ६६ ग्रामपंचायतचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे.
 
 
Buldhana News
 
अनुसूचित जाती एकूण १२ जागा पैकी सहा महिलांसाठी राखीव अनुसूचित जमातीच्या ३ जागा पैकी दोन जागा महिलांसाठी राखीव नागरिकांचा मागास प्रवर्ग १८ जागा पैकी ९ जागा महिलांसाठी राखीव तसेच सर्वसाधारण ३३ ग्रामपंचायत १७ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे यावेळी तालुयातील ग्रामपंचायतचे सरपंच नागरी तलाठी मंडळ अधिकारी व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार शशिकांत वाघ, सविता तायडे, नितीन रिंढे, अजय राऊत तसेच महसूल सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.