ब्रह्मपुरी तालुक्यात अतिवृष्टी

24 तासात कोसळला 162 मिमी पाऊस

    दिनांक :08-Jul-2025
Total Views |
ब्रम्हपुरी,
Brahmapuri गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने आता वेग पकडला आहे. गेल्या 24 तासात 162 मिमी पावसाची नोंद मंगळवारी सकाळी झाली. दरम्यान, पावसाने उसंत घेतली नसून ब्रम्हपुरी तालुक्यात पाऊस सुरूच आहे. सततच्या पावसाने ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्‍हेर नवरगाव येथील पंढरी उरकुडे, नंदलाल ठेंगरे यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या. पारडगाव-ब्रम्हपुरी मार्ग बंद झाला असून, भुती नाल्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. गोसेखुर्द धरणाचे 33 दारे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
Brahmapuri
 
ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान येथे 92.3 मिमी पाऊस, गांगळवाडी 110.2, अर्‍हेर नवरगाव 97.4, मेंडकी 113.2, आवळगाव 110.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाळ्यात 343.45 मिमी पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे ब्रम्हपुरी शहर जलमय झाले असून, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक, तहसील कार्यालय रोड, डॉ. गणवीर हॉस्पिटल पाण्याखाली आहे. वडसा रोडवर राईस मिलपासून भूती नाल्यापर्यंत पाणीच पाणी आहे. वडसा रोड बंद झाला आहे. बोरगाव येथील पुलावर पाणी आहे. दुसरीकडे कुर्झा-अर्‍हेर नवरगाव मार्ग आधीच बंद होता. आता भूती नाल्याचे पाणी शेतात शिरले आहे. कन्हाळगाव पुलावर पाणी असल्याने नांदगाव, अर्‍हेर नवरगाव, पिंपळगाव मार्ग बंद आहेत. तर, वडसा रोड परिसरातील नवेगाव कोथुळना, सोंदरी, सुरबोडी, चिखलगाव, झिलबोडी, परसोडीसह अनेक गावांचे रस्ते बंद आहेत. काहाली, नान्होरीदरम्यान पुलावर पाणी असून, कालेता मार्गावरील काही खोलगट भागात पाणी भरले आहे. पावसामुळे रोवणे होऊनही धानपिक पाण्याखाली आहे. तर, आवत्या धान अद्याप लहान आहे. पाणी शेतात भरल्याने पिकाला नुकसान आहे. बांधावरील तूर व भाजीपाला पिकाचेही नुकसान होणार आहे.