तर काही घरांचे नुकसान, अनेक मार्ग ठप्प
चंद्रपूर,
The field is flooded दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतशिवाय जलमय झाले आहेत. 60 टक्के धानाच्या पेरण्या आटोपल्या असल्या आणि शेतकरी आनंदात असले तरी, सततच्या पावसाने अनेक घरांची पडझळ झाली आहे. पारडगाव-ब्रम्हपुरी मार्ग बंद झाला असून, भुती नाल्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. गोसेखुर्द धरणाचे 33 दारे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि शेतकरी शेतीच्या कामात गुंतला असला तरी या पावसाने नुकसानही बरेच केले आहे. नागभीड तालुक्यातील पळसगाव (खुर्द) येथील विधवा महिला चंद्रकला सोनटक्के यांचे घर मंगळवारी आलेल्या संततधार पावसामुळे पडले. घुग्घूस शहरात नजीकचे नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच वर्धा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात मात्र अतिवृष्टी असून, 24 तासात कोसळला 128 मिमी पाऊस पडला आहे. वडसा मार्ग बंद झाला आहे. बोरगाव येथील पुलावर पाणी आहे. दुसरीकडे कुर्झा अहेर नवरगाव मार्ग आधीच बंद होता. आता भूती नाल्याचेही पाणी शेतात शिरले आहे. कन्हळगाव पुलावर पाणी असल्याने नांदगाव, अहेर नवरगाव, पिंपळगाव मार्ग बंद आहेत. तर वडसा रोड परिसरातील नवेगाव कोथुडंना, सोंदरी, सुरबोडी, चिखलगाव, झिलबोडी, परसोडी सह अनेक गावांचे रस्ते बंद आहेत. काहाली, नांहोरी, दरम्यान पुलावर पाणी असून, कालेता मार्गांवरील काही खोलगट भागात पाणी भरले आहे. पावसामुळे रोवणे झाले पण धानपिक पाण्याखाली आहे. आवत्या धान अद्याप लहान आहे. पाणी शेतात भरल्याने पिकाला नुकसान होण्याची शक्यता आहे. बांधावरील तूर व भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात 143.4 मिमी पाऊस
जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत सरासरी 143.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 341.3 मिमी पाऊस ब्रम्हपुरी तालुक्यात, तर सर्वात कमी 65.9 मिमी पाऊस गोंडपिपरी तालुक्यात झाला आहे. तर, बल्लारपूर तालुक्यात 77.5 मिमी, कोरपना 90.1 मिमी, सिंदेवाही 130.2 मिमी, नागभीड 304.5 मिमी, चंद्रपूर 105.9 मिमी, मूल 150.2, चिमूर 139.3 मिमी, वरोडा 83.4, जिवती 102.8 मिमी, भद्रावती 95.9 मिमी, राजुरा 69.0, पोंभुर्णा 93.3, तर सावली तालुक्यात 161.6 पावसाची नोंद झाली आहे.