"सतत पाठदुखी ? किडनी कर्करोगाचं लक्षण असू शकतं !"

    दिनांक :09-Jul-2025
Total Views |
kidney cancer सतत पाठदुखी जाणवतेय का? तुम्हीही याकडे थकवा किंवा अशक्तपणाचे लक्षण समजून दुर्लक्ष करत असाल, तर सावधान! डॉक्टरांच्या मते, ही पाठदुखी किडनी कर्करोगाचे गंभीर लक्षण असू शकते. त्यामुळे अशा वेळी विलंब न करता योग्य तपासणी करणे अत्यावश्यक आहे.
 
kidney cancer
 
किडनी कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अशी ओळखा:
किडनीतील कर्करोग सुरुवातीला स्पष्ट लक्षणे न देता शरीरात पसरत जातो. मात्र, खालील लक्षणे दिसू लागल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या:
लघवीत रक्त दिसणे (जरी एकदाच झाले तरी)
पाठदुखी किंवा कमरेच्या बाजूला वेदना
अचानक वजन कमी होणे
थकवा, अशक्तपणा
किडनीजवळ गाठ किंवा सूज जाणवणे
काय कराल पुढील टप्प्यावर?
जर ही लक्षणे आढळली तर डॉक्टर अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन किंवा एमआरआयसारख्या चाचण्या सुचवतात. गाठ आढळल्यास बायोप्सीद्वारे तिचे स्वरूप तपासले जाते.
धोकादायक कारणे कोणती?
धूम्रपान: किडनीवर विपरित परिणाम
लठ्ठपणा: हार्मोनल असंतुलनामुळे धोका
उच्च रक्तदाब: नियंत्रण न झाल्यास किडनीवर ताण
कौटुंबिक इतिहास: अनुवंशिकता महत्त्वाची
डायलिसिस: दीर्घकालीन उपचारांचा परिणाम
डॉक्टरांचा सल्ला:
शरीराकडून मिळणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. सतत पाठदुखी म्हणजे केवळ थकवा नाही, तर त्यामागे गंभीर आजार असण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेवर तपासणी करून योग्य निदान करणे हेच आरोग्याचे संरक्षण होय. वरील माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे. कोणतीही वैद्यकीय कृती करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.